मॅनहोलची स्‍वच्‍छता करणार्‍या कर्मचार्‍याच्‍या अंगावरून गाडी गेल्‍याने मृत्‍यू !

मॅनहोल (भूमीगत गटारात जाण्‍याचा मार्ग) मध्‍ये उतरून ड्रेनेजची यंत्रणा स्‍वच्‍छ करणार्‍या कर्मचार्‍याच्‍या अंगावरून गाडी गेली. जगवीर यादव (वय ३७ वर्षे) असे त्‍याचे नाव आहे. तो वर येत असतांनाच गाडी अंगावरून गेल्‍याने तो मॅनहोलमध्‍येच अडकला.

दुमजली बंगला खचून वृद्ध आईसह मुलाचा मृत्‍यू !

विद्याविहार पूर्वेला असलेल्‍या चित्तरंजन कॉलनीत २५ जून या दिवशी दुमजली बंगला ८ ते १० फूट खाली खचला होता. रात्री विलंबाने हा बंगला पूर्णपणे पाडून आतमध्‍ये अडकलेले नरेश पलांडे (वय ५६ वर्षे) आणि त्‍यांची आई अलका पलांडे (वय ९४ वर्षे) यांना २० घंट्यांनंतर बाहेर काढण्‍यात आले..

अधिवक्‍ता गुणरत्न सदावर्ते यांच्‍या पॅनलने १९ जागा जिंकल्‍या !

महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात प्रदीर्घ काळ चालू असलेल्‍या एस्.टी. कर्मचार्‍यांच्‍या आंदोलनाचे नेतृत्‍व करणारे अधिवक्‍ता गुणरत्न सदावर्ते यांच्‍या पॅनलने स्‍टेट ट्रान्‍सपोर्ट को-ऑप बँकेच्‍या निवडणुकीत बाजी मारली आहे. बँकेतील संचालकपदाच्‍या १९ जागांसाठी ही निवडणूक झाली होती.

नागपूर येथे इयत्ता १० वीत शिकणार्‍या मुलीचा विवाह रोखला !

इयत्ता १० वीत शिकणार्‍या अल्‍पवयीन मुलीचा ३० वर्षीय तरुणासमवेत होणारा विवाह महिला आणि बालविकास विभागाच्‍या पथकाने धंतोली पोलिसांच्‍या साहाय्‍याने रोखला.

नाशिक येथील अंजनेरी-ब्रह्मगिरी या प्रस्‍तावित रोपवेला पर्यावरणप्रेमींचा विरोध !

अंजनेरी-ब्रह्मगिरी या प्रस्‍तावित रोपवेला (ट्रॉलीमध्‍ये बसून तारांच्‍या साहाय्‍याने उंच ठिकाणी जाण्‍याचा मार्ग) पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला. रोपवेमुळे होणार्‍या जैवविविधतेची हानी लक्षात घेता तातडीने हा रोपवे रहित करावा, या मागणीसाठी ब्रह्मगिरी येथे जटायू पूजन करून ग्रामस्‍थ आणि पर्यावरणप्रेमी यांनी विरोध केला.

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या अध्‍यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड !

९७ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या अध्‍यक्षपदी येथील डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्‍या महामंडळाच्‍या बैठकीत संमेलनाध्‍यपदी शोभणे यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले.

माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि साहाय्‍यक पोलीस निरीक्षक राहुल राऊत यांना ५ दिवस पोलीस कोठडी !

या दोघांना कोल्‍हापूर पोलिसांनी सोलापूर येथून कह्यात घेतले आणि न्‍यायालयात उपस्‍थित केले. आत्‍महत्‍या करण्‍याच्‍या पूर्वी संतोष शिंदे यांनी लिहिलेल्‍या चिठ्ठीत पुण्‍यातील अन्‍य दोघांचीही नावे असून पोलीस या प्रकरणाचे अधिक अन्‍वेषण करत आहेत.

आदित्‍य ठाकरे यांच्‍या आरोपांना पत्रकार परिषद घेऊन सडेतोड प्रत्‍युत्तर देणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

दीपक केसरकर म्‍हणाले, ‘‘आदित्‍य ठाकरे यांच्‍यासारख्‍या तरुणांना शिकवणारे दुसरेच कुणीतरी आहे. ‘खोटे बोला; पण रेटून बोला’, असे करून आमच्‍यावर खोटे आरोप करत आहेत.

गोरक्षकांवर खोटे गुन्‍हे नोंद करणार्‍या पोलिसांच्‍या विरोधात पुणे येथे चिल्लर फेक आंदोलन’ !

गोरक्षकांवर जाणूनबुजून खोटे गुन्‍हे नोंद केल्‍याविषयी पोलीस प्रशासनावर कारवाई व्‍हावी, यासाठी हे आंदोलन करण्‍यात आले. गोरक्षक श्री. अक्षय कांचन यांनी एक गाडी पकडली होती. त्‍यामधील म्‍हशी पोलिसांनी कोणताही विचार न करता पशूवधगृहामध्‍ये दिल्‍या

काँग्रेसच्‍या राज्‍यात गोरक्षकांची स्‍थिती जाणा !

‘कायदा हातात घेणार्‍या गोरक्षकांना लाथ मारून कारागृहात टाका’, असा आदेश काँग्रेसचे अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र तथा कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी बकरी ईदच्‍या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक पोलिसांना दिला.