Indian Fans Clash With Khalistan Supporters : मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथील भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याच्या वेळी खलिस्तान्यांची भारतविरोधी घोषणाबाजी

भारतीय प्रेक्षकांनी दिले जशास तसे उत्तर !

भारतीय प्रेक्षक(डावीकडे) खलिस्तान समर्थक (उजवीकडे)

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – खलिस्तान समर्थकांनी क्रिकेट सामन्यांच्या वेळी भारतविरोधी कृत्य करण्याचा प्रयत्न केला. सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असून येथे ऑस्ट्रेलिया समवेत चौथा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवला जात आहे. या सामन्याच्या वेळी सकाळीच खलिस्तान समर्थक स्टेडियममध्ये बेकायदेशीरित्या घुसले. त्यांनी भारतविरोधी घोषणा देण्यास प्रारंभ केला. त्यांच्या हातात खलिस्तानी झेंडेही होते. त्यांना विरोध करतांना स्टेडियमधील भारतीय प्रेक्षकांनी भारतीय तिरंगा फडकवत भारताच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या वेळी ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी खलिस्तान समर्थकांना बाहेर काढले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत.

संपादकीय भूमिका

जगभर पसरलेल्या खलिस्तानवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी भारत सरकार काय प्रयत्न करणार ?