अहिल्यानगर (नगर) येथील श्री विशाल गणपति मंदिरासह १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार आणि संस्कृती जपण्यासाठी नागपूर आणि अमरावती यानंतर आता येथील १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांचे निधन !

महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, फिल्मफेअर आदी पुरस्कारांनी सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना (वय ९४ वर्षे) यांचे ४ जून या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले.

म्हैसुरू मुक्त विद्यापिठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने होणारा कार्यक्रम रोखण्याचा विद्यापिठाचा अयशस्वी प्रयत्न !

कर्नाटकातील काँग्रेसच्या राज्यात टिपू सुलतान उदो उदो होणार, तर सावरकरांना वाळीत टाकण्याचाच प्रयत्न होणार, यात शंका नाही ! यावरून तरी काँग्रेसला निवडून चूक केल्याचे राज्यातील हिंदूंच्या लक्षात आल्यास तो सुदिन ठरेल !

नाशिक येथील महापालिकेच्या शिक्षणाधिकार्‍याला लाच घेतांना अटक !

‘एसीबी’च्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या आदेशाने पथकाने सुनीता यांच्या घराची झडती घेतली असता लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरातून ८५ लाख रुपयांची रोकड आणि ३२ तोळे सोने सापडले आहे.

बलात्काराचे प्रकरणाशी ज्योतिषशास्त्राचा संबंध कसा ? – सर्वोच्च न्यायालय

पीडितेने म्हटले की, युवकाला माझ्याशी विवाह करायचा नाही, म्हणून तो खोटे बोलत आहे. मला मंगळदोष नाही. यावर उच्च न्यायालयाने वरील आदेश दिला.

अमरावती येथे पंढरपूर वारी पालखी दर्शन आणि पूजन सोहळ्यात सनातनच्या साधकांचा सहभाग !

वेदसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पायी वारीला जाणार्‍या भक्तांचे स्वागत, पालखीचे पूजन येथे राजापेठ चौकात १ जूनला करण्यात आले. या प्रसंगी सनातनच्या साधकांना आमंत्रित करण्यात आले होते.

नक्षलवादी पोलिसांवर पुलवामामधील आक्रमणसारखे घातक आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !

आता प्रथमच नक्षलवाद्यांनी ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांवर स्फोटकांच्या साहाय्याने आक्रमण करण्याच्या योजनेवर काम चालू केले आहे.
 

राष्ट्र आणि धर्म हे एकाच नाण्याचे दोन पैलू आहेत ! – दुर्गेश जयवंत परुळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

श्री लक्ष्मीनारायण देवस्थान कल्याणच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या १६५ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या त्यांच्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.

राज्य सरकार लव्ह जिहाद प्रकरणावर सजग आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

दुसर्‍या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर कोणताही आक्षेप असू नये; मात्र सध्या महिलांची दिशाभूल करून, खोटी आश्वासने देऊन लग्न केली जात आहेत. ज्या लोकांचे आधीच लग्न झाले आहे, ते वेगळी ओळख सांगून महिलांना फसवत आहेत. त्यावरून लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत, असे दिसत आहे.