तमिळनाडूमधील हिंदुविरोधी कारवायांना सरकारी पाठिंबा ! – श्री. अर्जुन संपत, संस्थापक अध्यक्ष, हिंदू मक्कल कत्छी, तमिळनाडू

श्री. अर्जुन संपत, संस्थापक अध्यक्ष, हिंदू मक्कल कत्छी, तमिळनाडू

तमिळनाडूमध्ये मुसलमान कट्टरपंथी, ख्रिस्ती मिशनरी, साम्यवादी, प्रसारमाध्यमे आणि सत्ताधारी द्रमुक पक्ष हे हिंदुविरोधी कारवाया करत आहेत. राज्यातील मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ देशविरोधी शक्तींच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरवत आहेत. तमिळनाडूमध्ये मात्र मुख्यमंत्री स्टॅलिन राज्यातील मंदिरांवर बुलडोझर फिरवत आहेत. सरकारने १६० मंदिरे पाडली. तमिळनाडूमधील दलितांमध्ये हिंदुविरोधी प्रचार केला जात आहे. शाळांमध्ये ख्रिस्ती मिशनरी ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत आहेत. त्याला सरकारकडून साहाय्य केले जात आहे.

सरकारकडून ब्राह्मण, संस्कृत आणि हिंदी यांच्या विरोधी कारवाया चालू आहेत. ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून शहरी नक्षलवादी कारवायांना साहाय्य केले जात आहे. तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुविरोधी कारवाया चालू असल्या, तरी तमिळनाडू ही मूळ हिंदूंची पुण्यभूमी आहे. नवीन संसदेमध्ये नेण्यात आलेला ‘सांगोल’ (धर्मदंड) या भूमीतूनच नेण्यात आला. ज्या ठिकाणी स्टॅलिन यांनी हिंदुविरोधी बैठका घेतल्या, त्याच ठिकाणी आम्ही शिवाचार्य संप्रदायाच्या समवेत बैठकांचे आयोजन करून हिंदूंचे संघटन केले. मंदिरे आणि गोमाता यांच्या रक्षणासाठी आम्ही अभियान चालू केले आहे. तमिळनाडूमधील प्रत्येक जिल्ह्यात हिंदूंचे संघटन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना तमिळनाडूमधून होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

अशी माहिती तमिळनाडूतील हिंदु मक्कल कत्छीचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन संपत यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी दिली.