आम्ही युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी रशियाला शस्त्रे देणार नाही ! – चीन

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी निवेदनात म्हटले की, रशियाला पाठवलेल्या त्या वस्तूंवरही बंदी घालण्यात येईल, ज्यांचा वापर नागरी आणि सैनिकी दोन्हींसाठी करता येईल. चीनला युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे.

पाकिस्तानी ड्रोनद्वारे पाठवलेले २१ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

पाकिस्तानमधून तस्करांनी बच्चीविंड गावामध्ये पाठवलेल्या ड्रोनवर भारतीय सैनिकांनी गोळीबार करून ते पळवून लावले.

म्हापसा येथील महारुद्र देवस्थानची मंदिर प्रवेश करतांना भारतीय पोशाख घालण्याची भक्तांना सूचना !

गोवा राज्यातील प्रत्येक मंदिरामध्ये पारंपरिक पोशाख बंधनकारक केला पाहिजे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे पोलीस करणार पायी गस्त !

भाविकांच्या सुरक्षेसाठी पंढरपूर शहरातून पोलिसांनी पायी गस्त करावी,समाजकंटक, गुंडगिरी करणारे, भुरटे चोर यांच्यावर जरब बसावी, यासाठी पोलीस अधिकार्‍यांना सरदेशपांडे यांनी या सूचना दिल्या आहेत.

देशभरातील मुसलमान महिलांना मशिदीत नमाजपठण करू द्या ! – पुण्यातील दांपत्याची मागणी

यामुळे गेल्या वर्षीच्या रमजान मासात जिथे महिलांना अटकाव करण्यात आला होता, त्याच बोपोडीतील मशिदीमध्ये यंदा मुसलमान महिला नमाजपठण करतांना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील अर्धवेळ ग्रंथपाल आता पूर्णवेळ होणार !

नवीन आकृतीबंधानुसार राज्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत १ सहस्रापेक्षा अधिक विद्यार्थी असणार्‍या शाळांमध्ये पूर्णवेळ एक ग्रंथपालाचे पद मान्य करण्यात आले आहे.

ग्रामसेवकाला लाच घेतांना पकडले !

या संदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाल्यावर त्यांनी सापळा रचून ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना आरोपीला पकडले.

नगर येथील २ पोलिसांवर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

४३ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता ८ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे, तसेच दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

निवडणुकीसाठी राष्ट्रपुरुषांचा उपयोग करू नये ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

कर्नाटकमध्ये होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुसलमानांची मते मिळावीत, यासाठी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

थोर पुरुषांची नावे वापरून गोतस्करी करणार्‍यांवर कारवाई करा ! – राष्ट्रीय छावा संघटना

थोर पुरुषांची नावे वापरून अवैध कृत्ये करणार्‍यांवर कारवाईची मागणी करणार्‍या ‘राष्ट्रीय छावा संघटने’चे अभिनंदन !