रशियन आणि अमेरिकन गुप्‍तचर संस्‍थांसह भारतातील घटकांनी लालबहाद्दूर शास्‍त्री यांचा मृत्‍यू घडवला ! – लेखक पंकज कालुवाला

पंतप्रधान लाल बहाद्दूरशास्‍त्री यांचा मृत्‍यू संशयास्‍पदरित्‍या होऊनही त्‍याविषयीच्‍या घडामोडी भारतियांपुढे न येणे, यातून तत्‍कालीन काँग्रेसच्‍या कारभाराविषयी प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित होते !

उत्तरदायींना कारागृहात डांबा !

हत्‍या करण्‍यात आलेला कुख्‍यात गुंड अतिक अहमद आणि त्‍याचा भाऊ अश्रफ अहमद यांच्‍या समर्थनार्थ माजलगाव (जिल्‍हा बीड) येथील चौकात लावण्‍यात आलेल्‍या फलकांवर त्‍यांना ‘हुतात्‍मा’ म्‍हटले होते.

पाटण (गुजरात) येथील रोटलिया हनुमान मंदिरातील भजनाच्या कार्यक्रमामध्ये गोळा झाल्या ५० सहस्र भाकर्‍या !

प्रसिद्ध लोकगायक कीर्तीदान गढवी यांच्या भजनाच्या कार्यक्रमामध्ये प्रवेश करण्यासाठी १ ते १० भाकर्‍या आणण्याचे तिकीट ठेवण्यात आले होते. नंतर या भाकर्‍या गाय, श्‍वान आणि अन्य पशू अन् प्राणी यांना देण्यात आल्या.

छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस आयुक्‍तांच्‍या पाठिंब्‍याने हप्‍ते वसुली ! – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप !

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्‍याच्‍या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले असून त्‍यात छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्‍या भ्रष्‍ट कारभाराविषयी तक्रार केली आहे, तसेच शहर पोलीस कशा प्रकारे हप्‍ते वसूल करतात ? हेही नमूद केले आहे.

वक्‍फ बोर्डा’ला देशातील भूमी बळकावण्‍याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा !

‘वक्‍फ बोर्डा’ला देशातील भूमी बळकावण्‍याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करावा, या मागणीसाठी १९ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्‍थानकाशेजारी हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन करण्‍यात आले.

एकनाथ खडसे यांसह पत्नी आणि जावई यांनी भूमी अवैधरित्‍या खरेदी केल्‍याचे मुंबई न्‍यायालयाचे निरीक्षण !

सादर पुराव्‍यांचा विचार करता एकनाथ खडसे, त्‍यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील भूमी अवैधरित्‍या संपादित केल्‍याचे सकृतदर्शनी स्‍पष्‍ट होते, असे निरीक्षण मुंबई उच्‍च न्‍यायालयाने नोंदवले आहे.

रस्‍ता खोदतांना जलवाहिनी फोडणार्‍या ठेकेदाराला ८ लाख रुपयांचा दंड !

जलवाहिनी फुटल्‍याने स्‍थानिक भागातील पाणीपुरवठा २ दिवस खंडित झाल्‍याने रहिवाशांचे पुष्‍कळ हाल झाले. नागरिकांनी विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. नागरिकांच्‍या या रोषाला सामोरे जात महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला होता.

शुल्‍क भरले नाही म्‍हणून निकाल रोखल्‍यास शाळांवर कारवाई करणार ! – शिक्षण विभाग

अडवणूक शाळांना करता येणार नाही, अन्‍यथा शिक्षण अधिकार्‍यांच्‍या साहाय्‍याने त्‍यांच्‍यावर कारवाई करणार असल्‍याची चेतावणी शिक्षण विभागाने दिली आहे.

पुणे जिल्‍ह्यातील १२ प्राथमिक शाळा अनधिकृत !

एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा अनधिकृतपणे चालू कशा झाल्‍या ? याकडे कुणाचेच लक्ष का नाही, हेही शोधायला हवे !

जारमधून पिण्‍याच्‍या पाण्‍याची विक्री करण्‍यासाठी यापुढे सरकारची अनुमती लागणार !

यापुढे जारमधून पाणी विकण्‍यासाठी अन्‍न आणि औषध प्रशासन विभागाची अनुमती घ्‍यावी लागणार आहे.