महाराष्ट्रातील अर्धवेळ ग्रंथपाल आता पूर्णवेळ होणार !

ग्रंथपाल (प्रातिनिधिक छायाचित्र )

वर्धा – अर्धवेळ पद असल्याने ग्रंथालये पूर्णपणे सक्षमतेने चालत नसल्याची तक्रार होती. नवीन निर्णयाने ती दूर होणार आहे. नवीन आकृतीबंधानुसार राज्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत १ सहस्रापेक्षा अधिक विद्यार्थी असणार्‍या शाळांमध्ये पूर्णवेळ एक ग्रंथपालाचे पद मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार २ सहस्र ११८ पदे संमत होतात, तसेच अर्धवेळ ग्रंथपाल पद व्यपगत म्हणजे मृत संवर्गात गेले आहे. या पार्श्‍वभूमीवर कार्यरत असलेल्या १ सहस्र २७६ अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळचा दर्जा देण्यात येणार आहे; मात्र उपलब्ध पदे १ सहस्र १९२ एवढीच आहेत.

१. प्रथम २ सहस्रांहून अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना पूर्णवेळ ग्रंथपाल मिळणार आहे. त्यानंतर ३ सहस्रांहून अधिक विद्यार्थी असलेल्या ५३ शाळांना १०६ पदे मिळतील. उर्वरित पदे ही वेगळ्या निकषावर भरली जातील.

२. २ आणि ३ शाळा एकत्रित करत १ सहस्रापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या निश्‍चित होईल. निर्माण होणार्‍या पदांवर प्रथम अर्धवेळ ग्रंथपाल नियुक्त होणार आहे.

३. सेवाज्येष्ठतेच्या आधारे आणि सलग ५ वर्षे सेवा झालेल्या मान्यताप्राप्त अर्धवेळ ग्रंथपालांनाच पूर्णवेळ पदाचा लाभ मिळणार, तसेच त्यांची सेवा ही पूर्णवेळ पदाच्या आगाऊ वेतनवाढीसाठी लागू होणार नाही.