म्हापसा येथील महारुद्र देवस्थान समितीचे अभिनंदन !
म्हापसा, १४ एप्रिल (वार्ता.) – सद्यःस्थितीत भाविक कुठल्याही प्रकारचे, तसेच अयोग्य पोशाख परिधान करून मंदिरात प्रवेश करतात. यामुळे मंदिराचे पावित्र्य नष्ट होते. असे होऊ नये, यासाठी म्हापसा येथील महारुद्र देवस्थान समितीने स्तुत्य कृती केली आहे.
या देवस्थान समितीने देवस्थानच्या फलकावर ‘सर्व भक्तांना विनंती आहे की, मंदिरात येतांना योग्य पोशाख किंवा भारतीय पोशाख परिधान करणे आवश्यक आहे’, अशी सूचना इंग्रजी आणि मराठी या भाषांत लिहिली आहे. भाविकांना योग्य पोशाख परिधान करून मंदिरात प्रवेश करण्यासाठी आवाहन केल्याबद्दल मंदिर समितीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
संपादकीय भूमिकागोवा राज्यातील प्रत्येक मंदिरामध्ये पारंपरिक पोशाख बंधनकारक केला पाहिजे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते ! |