सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हत्येसाठी गायींची वाहतूक करण्याच्या प्रकारांवर कारवाईची मागणी
सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गायी आणि गुरे यांची अवैध वाहतूक केली जात आहे. अशी वाहतूक करतांना वाहनांवर ‘छत्रपती’, ‘छावा’ या शब्दांचा वापर करण्यात आल्याचा प्रकार नुकताच कणकवली येथे उघड झाला. या वाहनात गायींना कोंबून त्यांची वाहतूक केली जात होती. त्यामुळे या गाडीचा चालक आणि मालक यांच्यावर कारवाई करून असे प्रकार रोखावेत, अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटना, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने येथील पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात पोलीस नाईक दीपिका मठकर यांनी हे निवेदन स्वीकारले.
हे निवेदन देतांना छावा संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, उपाध्यक्ष रामचंद्र कुडाळकर, सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते शिवा गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप नाईक, माडखोल प्रभाग अध्यक्ष संदीप चांदरकर, ज्ञानेश्वर पारधी, उमेश तळवणेकर यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट पोलीस तपासणीनाक्यावर पोलिसांनी १२ एप्रिल या दिवशी ‘छत्रपती’, असे लिहिलेल्या टेम्पोतून १० गोवंशीय आणि २ म्हशी यांची वाहतूक पोलिसांनी रोखली होती आणि ३ धर्मांधांना कह्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय छावा संघटने’ने पोलिसांना निवेदन दिले आहे.
सविस्तर वृत्त वाचा –
♦ सिंधुदुर्ग : टेम्पोवर ‘छत्रपती’ लिहून गोवंशियांची अवैध वाहतूक करणारे ३ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !
https://sanatanprabhat.org/marathi/673144.html
गोवंशियांना अमानुषपणे कोंबून त्यांना हत्येसाठी घेऊन जात असलेल्या टेम्पोवर पोलिसांनी कारवाई करून तीन धर्मांध मुसलमानांना अटक केली. या वेळी पोलिसांनी टेम्पोतून १० गोवंशीय आणि २ म्हशी यांची सुटका केली.
संपादकीय भूमिकाथोर पुरुषांची नावे वापरून अवैध कृत्ये करणार्यांवर कारवाईची मागणी करणार्या ‘राष्ट्रीय छावा संघटने’चे अभिनंदन ! |