अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांची हत्या

पत्रकाराच्या रूपात तेथे आलेल्या ३ जणांनी पाठीमागून येऊन कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा गुंड भाऊ अश्रफ अहमद यांची डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली. तिघांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यावर त्यांना अटक करण्यात आली.

मुंबईत ३ आतंकवादी घुसल्याची खोटी माहिती देणार्‍या धर्मांधाला नगर येथून अटक !

प्रथम खोटी माहिती देऊन एक दिवस खरोखरच आतंकवाद्यांना घुसण्यासाठी साहाय्य करायलाही हे धर्मांध मागे-पुढे पहाणार नाहीत. त्यामुळे अशा धर्मांधांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !

विवेक सभेत डॉ. उदय निरगुडकर यांचे कालातीत स्वातंत्र्यवीर सावरकर यावर व्याख्यान !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री शिवछत्रपतींना मासिक श्रद्धांजली वहाण्यासाठी विवेक सभा आयोजित केली जाते. या विवेक सभेत रविवार, १६ एप्रिलला ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे कालातीत स्वातंत्र्यवीर सावरकर यावर सायंकाळी ६.३० सिटी हायस्कूल येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

रुग्णालयातील आगीच्या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना मानवाधिकार आयोगाची कारणे दाखवा नोटीस !

वसई-विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये वातानुकूलित यंत्रामुळे अतीदक्षता विभागात २३ एप्रिल २०२१ या दिवशी लागलेल्या आगीमध्ये १९ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

भूमीच्या वादातून थोरल्या भावाकडून सख्ख्या धाकट्या भावाची हत्या

वडिलोपार्जित भूमीवरून न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील किन्हईजवळ गणेशवाडी येथे थोरल्या भावाने सख्ख्या धाकट्या भावाची हत्या केली. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज फर्मागुडी येथे सभा

या सभेला २५ सहस्र लोकांची उपस्थिती अपेक्षित असून याद्वारे आगामी लोकसभा निवडणुकीच्या सिद्धतेचे बिगुल वाजणार आहे.

आर्.बी.एल्. बँकेद्वारे कोल्हापुरातील १०१ गरजू मुलींना सायकल आणि शालोपयोगी वस्तू यांचे वाटप !

आर्.बी.एल्. बँकेने त्यांच्या सी.एस्.आर्. उपक्रम – उमीद १०००च्या अंतर्गत कोल्हापुरातील १०१ गरजू मुलींना सायकल आणि शालोपयोगी वस्तू यांचे वाटप केले. हे वाटप जिल्हा परिषद येथे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

मिरज येथील श्री संत वेणास्वामी पुण्यस्मरण महोत्सवास प्रारंभ !

१९ एप्रिल या दिवशी पू. कौस्तुभबुवा रामदासी यांचे संत वेणास्वामी महानिर्याण कीर्तन होईल. हे सर्व कार्यक्रम ब्राह्मणपुरी येथील श्री संत वेणास्वामी मठ येथे होत आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी केले आहे.

मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी मुंबईकरांचा मूकमोर्चा !

भारतीय रेल्वे चालू होण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे थोर समाजसुधारक कै. नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्यात यावे, यासाठी १५ एप्रिल या रेल्वेदिनाच्या दिवशी नाना शंकरशेठ प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद यांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला.

अमरावती येथे पोलिसांनी ५२ गोवंशियांची तस्करी थांबवली !

केवळ गोवंशियांना वाचवणे नव्हे, तर त्यांची तस्करी करणार्‍यांना कठोर शिक्षा करणे हेही पोलिसांचे कर्तव्य आहे !