जलतरण तलावात महिलांना पोहण्यासाठी योग्य वेळ मिळावी ! – ‘व्हिजन इचलकरंजी’चे निवेदन
इचलकरंजी महानगरपालिकेच्या मालकीचे २ मोठे जलतरण तलाव आहेत. एक भगतसिंग बागेजवळ असून दुसरा घोरपडे नाट्यगृहाजवळ आहे. भगतसिंग बागेजवळील जलतरण तलाव हा बंद स्थितीत आहे.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या मालकीचे २ मोठे जलतरण तलाव आहेत. एक भगतसिंग बागेजवळ असून दुसरा घोरपडे नाट्यगृहाजवळ आहे. भगतसिंग बागेजवळील जलतरण तलाव हा बंद स्थितीत आहे.
राज्य सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. एका मासामध्ये ही समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.
गीता फाऊंडेशन मिरज यांच्या वतीने १२ कोटी ‘विष्णुसहस्रनाम’ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यांपैकी ७ कोटी आवर्तने पूर्ण झाली आहेत.
या प्रकरणी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने राज्यशासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते; मात्र सरकारने कोणतीही भूमिका सादर न केल्यामुळे महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने आरोपींच्या बाजूने एकतर्फी निकाल दिला.
तालुक्यातील खेडशी मंडल अधिकारी अमित जगन्नाथ चिपरीकर (वय ३९ वर्षे) याला ३१ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीच्या पथकाने १९ एप्रिल या दिवशी सापळा रचून पकडले.
या प्रसंगी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त समर्थभक्त श्री. मिलिंद कुलकर्णी यांनी साकडे घातले, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा सर्वांकडून म्हणून घेतली.
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे जलसंघर्ष यात्रा घेऊन येथील सीमेवर आले; मात्र पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा धामना गावात अडवली. पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले.
मागील १० दिवसांपासून ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांचे आमरण उपोषण चालू आहे.
राज्यस्तरीय शिक्षकांसाठीच्या स्पर्धेत मुख्याध्यापिका सौ. पौर्णिमा गडकरी यांनी ‘शाळेमध्ये लहान मुलांशी आदर्श संवाद कसा साधला जावा ?’, या विषयावर लिखाण केले होते.
पोलीस उपायुक्त कबाडे यांनी गुन्ह्यांमध्ये जप्त असलेली वाहने न्यायालयाच्या अनुमतीविना सोडली जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे, तसेच एकच वाहन २ किंवा त्याहून अधिक गुन्ह्यांमध्ये वापरल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित वाहनाची अनुमती रहित होण्याविषयी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश काढले आहेत.