नाशिक येथे ‘डीजे’सह अनावश्‍यक व्‍यय करणार्‍या निकाहवर मुसलमान धर्मगुरूंचा बहिष्‍कार !

समाजास परावृत्त करण्‍यासाठी नायब शहर-ए-काझी सय्‍यद एजाजुद्दीन काझी यांनी डीजे लावणार्‍यासह निकाहवर अनावश्‍यक व्‍यय जेथे आहे तेथे बहिष्‍कार टाकण्‍याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील बामू विद्यापिठातील प्राध्‍यापकाने केला विद्यार्थिनीवर बलात्‍कार !

असे वासनांध प्राध्‍यापक विद्यार्थ्‍यांना काय घडवत असणार ? अशा प्राध्‍यापकांना बडतर्फ करून कठोर शिक्षाच करायला हवी !

सिरम आस्‍थापनाने बंद केलेला वेशीचा रस्‍ता ग्रामस्‍थांच्‍या आंदोलनाच्‍या पावित्र्यामुळे चालू !

साडेसतरा नळी मांजरी बुद्रुक हद्दीवरील ‘डीपी’ आणि वेशीचा रस्‍ता येथील सिरम व्‍यवस्‍थापनाने पत्रे आडवे लावून बंद केला होता. नागरिकांनी हा रस्‍ता आस्‍थापनाने चालू करावा, अशी मागणी करत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आमदार चेतन तुपे यांच्‍या मध्‍यस्‍थीनंतर तूर्त रस्‍त्‍यावरील अडथळा हटवण्‍यात आला असून या ठिकाणाहून वाहतूक चालू करण्‍यात आली आहे.

पुणे येथे पोलीस कर्मचार्‍याच्‍या विरुद्ध गुन्‍हा नोंद !

असे मद्यपी आणि गुन्‍हेगार पोलीसकायदा आणि सुव्‍यवस्‍था कशी राखणार ?

अक्‍कलकोट देवस्‍थानच्‍या नावे भामट्यांकडून भाविकांची लूट !

देवस्‍थानांच्‍या नावे लूट केल्‍याने अनेक पटींनी पाप लागते, हे समजण्‍यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्‍यक !

नाशिक येथे बांधकाम व्‍यावसायिकांवर आयकर विभागाच्‍या धाडी !

येथील नामांकित करबुडव्‍या बांधकाम व्‍यावसायिकांची कार्यालये, फार्म हाऊस आणि निवासस्‍थाने या ठिकाणी आयकर विभागाने घातलेल्‍या धाडीत ३ सहस्र ३३३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्‍त करण्‍यात आली आहे.

समृद्धी महामार्गावर राजरोसपणे मद्यविक्री !

क्‍यू.आर्.व्‍ही.’ पथकाने जालना गावाजवळ केले ‘स्‍टिंग’ ऑपरेशन !
महामार्गावर २१ क्‍विक रिस्‍पॉन्‍स वाहने तैनात !

शिक्षणसंस्‍थांशी संबंधित कामात दिरंगाई झाल्‍यास अधिकार्‍यांच्‍या पदोन्‍नतीच्‍या वेळी विचार करणार !

शासकीय शाळांमधील शिक्षकांचे स्‍थानांतर, शाळांचे विविध प्रस्‍ताव आदी कामे त्‍या त्‍या वेळी पूर्ण न केल्‍यास सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्‍या ‘सर्व्‍हिस बूक’मध्‍ये त्‍याची नोंद करण्‍यात येईल आणि पदोन्‍नतीच्‍या वेळी या गोष्‍टी लक्षात घेतल्‍या जातील

आणखी २ दिवस गारपिटीचा मारा होणार !

राज्‍यात विदर्भात २६ एप्रिलपासून २ दिवस काही ठिकाणी पावसाचा यलो आणि ऑरेंज, तर नाशिक जिल्‍ह्यासह मराठवाडा, मध्‍य महाराष्‍ट्रात ‘यलो अलर्ट’ मुंबई आणि नागपूर वेधशाळेने घोषित केला आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्‍या हद्दीतील होर्डिंगची त्‍यांच्‍याकडे नोंदच नाही !

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्‍या हद्दीत अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगची संख्‍या मोठी आहे; मात्र पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे त्‍यांच्‍या हद्दीतील एकाही होर्डिंगची नोंद नाही.