नगर येथील २ पोलिसांवर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

( प्रतिकात्मक छायायाचित्र )

नगर – येथील एम्.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे ४३ वर्षीय व्यक्तीच्या मुलाविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद आहे. त्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी संमत झाली असून त्यात त्याला जामीन लवकर मिळण्याकरता साहाय्य करू, असे सांगून येथील पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोके आणि पोलीस हवालदार संदीप खेंगट यांनी तक्रारदाराकडे ८ सहस्र रुपयांची लाच मागितली. (अशा लाचखोर पोलिसांवर कठोर कारवाई केल्यासच पोलीस विभागातील लाचखोरीची कीड संपेल. – संपादक)

या प्रकरणी ४३ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता ८ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे, तसेच दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

लाचखोर पोलीस कायदा-सुव्यवस्था कधीतरी राखू शकतील का ?