गोवा राज्य विदेशी मंत्र्यांच्या ‘एस्.सी.ओ.’ बैठकीसाठी होत आहे सिद्ध !

‘एस्.सी.ओ.’ गटामध्ये रशिया, भारत, चीन, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गीझस्तान, तजाकिस्तान आणि उजबेकिस्तान या ८ सदस्यांचा समावेश आहे. याचे अध्यक्षपद सप्टेंबर २०२२ मध्ये भारताला मिळाले. ही बैठक बाणावली येथे होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील निम्‍म्‍यापेक्षा अधिक पोलीस ठाण्‍यांतील दूरभाष क्रमांक बंद !

पोलीस ठाण्‍यासारख्‍या महत्त्वाच्‍या विभागातील दूरभाष क्रमांक बंद असणे, म्‍हणजे जनतेला एकप्रकारे फसवण्‍याचाच प्रकार झाला. असे पोलीस खाते कायद्याचे राज्‍य देणार का ? वरिष्‍ठांनी यामध्‍ये लक्ष घालून जनतेला दिलेले क्रमांक चालू ठेवावेत, ही अपेक्षा !

लवकरच शिर्डी साईमंदिरात हार, फुले आणि प्रसाद यांवरील बंदी हटवली जाणार !

लवकरच शिर्डी साईमंदिरात २ वर्षांपूर्वी घालण्‍यात आलेली हार, फुले आणि प्रसाद यांवरील बंदी हटवली जाणार आहे. यासाठी साईसंस्‍थानच्‍या तदर्थ समितीने बंदी हटवण्‍यासंदर्भात अनुकूलता दर्शवली

गोवा मंत्रीमंडळात १० मेपूर्वी पालट होणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

१४ सप्टेंबर २०२२ या दिवशी काँग्रेसच्या ८ आमदारांनी भाजपात प्रवेश केला. यामधील काही आमदारांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

सडक्‍या सफरचंदांच्‍या वापरातून सिद्ध केलेल्‍या रसाची विक्री !

नवी मुंबई कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये व्‍यापार्‍यांनी फेकून दिलेल्‍या सडक्‍या सफरचंदांचा रस करून तो विकण्‍यात येत आहे. हे एका व्‍हिडिओद्वारे उघड झाले.

‘स्वयंपूर्ण’ गोव्याच्या निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

साळगाव पंचायतीत ‘स्वयंपूर्ण मित्र’ या नात्याने राज्यातील पंचायती आणि पालिका यांच्याशी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना हे आवाहन केले.

गोवा : वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुटुंबासहित श्री लईराईदेवीचे दर्शन घेतले

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी शिरगाव येथील श्री लईराईदेवीचे दर्शन घेऊन तिच्या चरणी प्रार्थना करून दिनक्रमाला प्रारंभ केला.

पुणे येथील ‘कॉसमॉस बँक सायबर आक्रमण’ प्रकरणातील ११ आरोपींना शिक्षा !

गुन्‍हेगारांनी गणेशखिंड येथील ‘कॉसमॉस बँके’च्‍या मुख्‍यालयातील ‘सर्व्‍हर हॅक’ करून ११ ते १३ ऑगस्‍ट २०१८ या कालावधीमध्‍ये ९४ कोटी रुपये काढून घेतले होते.

भारत सरकारने याकडे लक्ष द्यावे !

गेल्‍या काही दिवसांपासून श्रीलंकेतील हिंदु मंदिरांवर आक्रमणे होत असल्‍याच्‍या घटना घडत आहेत. देवतांच्‍या मूर्तींची तोडफोड आणि मूर्ती गायब होण्‍याचे प्रकार वाढले आहेत.

मतदार ओळखपत्र आधारकार्डला जोडण्‍याच्‍या मोहिमेत कोल्‍हापूर जिल्‍हा राज्‍यात पहिल्‍या १० मध्‍ये !

मतदार ओळखपत्र आधारकार्डला जोडण्‍याच्‍या मोहिमेत कोल्‍हापूर जिल्‍हा राज्‍यात पहिल्‍या १० मध्‍ये आहे. जिल्‍ह्यातील ३१ लाख ४८ सहस्र १९४ मतदारांपैकी २० लाख ४६ सहस्र ३२३ मतदारांचे ओळखपत्र आधारकार्डला जोडलेले असूून ही आकडेवारी ६५ टक्‍के आहे.