समृद्धी महामार्गावर ५६० वाहनांची पडताळणी !

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आर्.टी.ओ.) वाहन पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. ३ दिवसांत ५६० वाहनांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये ६७ वाहने अयोग्य स्थितीतील होती.

छत्रपती संभाजीनगर येथे ७५ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या पोलीस उपनिरीक्षकास अटक !

पोलीसदलातील असे भ्रष्ट पोलीस अधिकारी असल्यानंतर भ्रष्टाचाराची कीड कधीतरी संपेल का ? अशा भ्रष्ट पोलीस अधिकार्‍यांमुळे पोलीसदलाची समाजात नाचक्की होत असून यामुळे समाजाचा पोलिसांवरील विश्वास अल्प होत आहे.

जमशेदपूर येथे अधिवक्त्यासह ८ हिंदु कार्यकर्त्यांना अटक !

या हिंदूंना नाहक अटक करण्यात आली असेल , तर अशा पोलिसांवर कठोर कारवाई हवी !

काही न्यायमूर्ती आळशी असल्याने ते निकाल वेळेवर लिहित नाहीत !

काही न्यायमूर्ती आळशी आहेत. ते वेळेवर निर्णयही लिहित नाहीत. त्यांना निर्णय लिहिण्यासाठी अनेक वर्षे लागतात. काहींना तर कामही करता येत नाही.

बाह्य रुग्ण विभाग चालू होऊन १ घंट्यानेही आधुनिक वैद्य येईना !

शहरात संसर्गजन्य रोगांची साथ चालू आहे. कोरोना आणि एच् १ एन् १ संसर्गाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे; मात्र या आरोग्यकेंद्रात अतिशय
विदारक परिस्थिती दिसून आली. आधुनिक वैद्य १ घंट्यात न आल्याने रुग्णांना ताटकळत उभे रहावे लागते.

भगवान परशुराम परिक्रमेस पुणे येथून प्रारंभ !

श्री भगवान परशुराम जन्मोत्सवा’निमित्त गेले ८ वर्षे नगर ते भगवान परशुराम जन्मस्थान जनापाव (मध्यप्रदेश) अशी परिक्रमा काढली जाते. या वर्षीपासून ही परिक्रमा पुणे येथून प्रारंभ होऊन नगर – छत्रपती संभाजीनगर – माहूर मार्गे जनापाव येथे जाणार आहे.

टँकर लॉबीत राजकीय नेत्यांची सक्रीय भूमिका पडताळून पहावी !

नवीन १ सहस्र ६८० कोटी रुपये निधीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे स्थानांतर करू नये, असा आदेशही खंडपिठाने दिला आहे.

राज्यात मागील ३ वर्षांत बाललैंगिक अत्याचाराच्या २१ सहस्र ३८७ गुन्ह्यांची नोंद !

वर्ष २०२०, २०२१ आणि २०२२ या ३ वर्षांत राज्यात घडलेल्या अशा घटनांचा आलेख सतत वाढता असून मागील ३ वर्षांत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार २१ सहस्र ३८७ गुन्ह्यांची नोंद पोलिसांत झाली आहे.

नवीन शैक्षणिक धोरण जूनपासून राबवणार ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

राज्यात जूनपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची कार्यवाही केली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्यावर गोळीबार !

कर्नाटकमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या असंख्य हत्या झाल्या आहेत. तेथे जिहादी आणि नक्षलवादी यांच्यापासून हिंदुत्वनिष्ठांना धोका आहे. अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावरील आक्रमण हे हीच गोेष्ट अधोरेखित करते !