पुणे जिल्‍ह्यातील अनधिकृत होर्डिंग्‍ज तातडीने काढावेत ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्‍हाधिकारी

असे आदेश का द्यावे लागतात ? पालिका प्रशासन यावर स्‍वत:हून कारवाई का करत नाही ?

एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न ! – अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न चालू आहे. एरव्‍ही नियमित खटले, प्रलंबित निकाल देण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे वेळ नाही; मात्र समलैंगिकता विषयासाठी न्‍यायालयाकडे वेळ आहे !

अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्‍यास प्रादेशिक परिवहन मंडळाची टाळाटाळ !

कारवाईची आकडेवारी सांगण्‍यातही चालढकलपणा ! अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्‍यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांचे त्‍यांच्‍याशी संगनमत आहे का ?

पुणे ग्रामीण पोलिसांकडून ‘वारसा स्‍वच्‍छतेचा, मावळा शिवरायांचा’ मोहिमेला प्रारंभ !

अशी मोहीम पोलिसांना का राबवावी लागते ? पुरातत्‍व विभाग काय करत आहे ?

नागपूर येथील एन्.सी.आय. म्‍हणजे मध्‍य भारतातील कर्करोगाच्‍या उपचाराचे आरोग्‍य मंदिर ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

कॅन्‍सर इन्‍स्‍टिट्यूट’मुळे (एन्.सी.आय.) कर्करोगासारख्‍या दुर्धर व्‍याधीने ग्रस्‍त रुग्‍ण आणि त्‍यांचे नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे. ही संस्‍था विदर्भासह मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या मध्‍य भारतातील राज्‍यांसाठी आरोग्‍य मंदिर ठरत आहे.असे ते म्‍हणाले.

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ३२.३७ टक्के मतदान

या निवडणुकीत ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघातून १ सहस्र ६२१, तर ग्रामपंचायत मतदार संघातून १ सहस्र ७९४ मतदारांनी मतदान केले.

वारकर्‍यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे ! – रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

वारकर्‍यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे आहे. वारकरी भवनाचे चांगले होण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने साहाय्य देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

सूरज पांचोली यांची पुराव्‍यांअभावी निर्दोष मुक्‍तता !

अभिनेत्री जिया खान मृत्‍यू प्रकरणात सूरज पांचोली यांची पुराव्‍यांअभावी निर्दोष मुक्‍तता करण्‍यात आली आहे. विशेष सीबीआय न्‍यायालयाने जियाची आई राबिया खान यांना या निकालाला आव्‍हान देण्‍याची मुभा मात्र कायम ठेवली आहे.

गेल्या वर्षात भारत आणि रशिया यांच्यात ३६३ लाख कोटी रुपयांचा व्यापार !

भारत आणि रशिया यांच्यातील व्यवसाय हा मुख्यत्वे भारताने रशियन तेल मोठ्या प्रमाणात विकत घ्यायला आरंभ केल्याने वाढला. मार्च २०२३ मध्ये भारताने एका दिवसात अधिकाधिक १६ लाख ४० सहस्र बॅरेल तेल विकत घेतले.

कल्‍याण येथे ‘ग्रामीण कला मंच’ आणि दैनिक ‘अग्रलेख’ यांचा वर्धापनदिन उत्‍साहात साजरा !

‘ग्रामीण कला मंच’ आणि दैनिक ‘अग्रलेख’ यांचा वर्धापनदिन कल्‍याण येथील अत्रे रंगमंदिर येथे नुकताच पार पडला. या वेळी ‘रेड लाईट’ या २ अंकी नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर करण्‍यात आला