लाचेविना काम न करणार्‍या कर्तव्यचुकार अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !

७ सहस्र रुपयांची लाच घेतांना वरळी आरे दुग्दुधशाळा विभागाच्या साहाय्यक व्यवस्थापक रणजितसिंग कोमलसिंग राजपूत यांना २० एप्रिल या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली.

मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकार ‘क्युरेटिव्ह’ याचिका प्रविष्ट करणार !

राज्य सरकार आणि मराठा मोर्च्या चे समन्वयक विनोद पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वाेच्च न्यायालयात  पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली होती. २० एप्रिल या दिवशी सर्वाेच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

पाटली पुत्र (बिहार) येथे नमाजपठणा नंतर मशिदी मध्ये ‘अतीक अहमद अमर रहे’ आणि ‘मोदी -योगी मुर्दाबाद’च्या घोषणा !

पाटणा जंक्शन येथील मशिदी मध्ये शुक्रवारच्या नमाजपठणा नंतर कुख्यात गुंड अतिक अहमद यांच्या समर्थनार्थ अतिक अमर रहे’ आणि ’मोदी-योगी मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.

औद्योगिक वापराच्या ७८ भूखंडाचे निवासी भूखंडात रूपांतर !

शहरातील ७८ औद्योगिक भूखंडाचे गेल्या १५ वर्षात निवासी भूखंडात रूपांतर झाले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्र अल्प होऊन त्या जागांवर बहुमजली इमारतींचा गृहप्रकल्प साकारला जात आहे.

बालविवाह होत असल्यास प्रशासनाकडे संपर्क करण्याचे आवाहन !

राज्यात अक्षय्य तृतीया हा सण शुभमुहूर्त मानला जातो आणि या मुहूर्तावर बहुतांश बालविवाह केले जातात. बालविवाह केल्यास कायद्यानुसार १ लाख रुपये दंड आणि २ वर्षांपर्यंत सक्तमजूरीची शिक्षा होऊ शकते.

सातारा येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने प्रवासी बसगाड्यांची विशेष तपासणी मोहीम !

खासगी आणि इतर बस, तसेच प्रवासी वाहने राष्ट्रीय महामार्गावर अनधिकृतपणे थांबा घेऊन प्रवासी चढ-उतार करतात. त्यामुळे इतर रस्ता उपयोग करणारे घटक यांना धोका उत्पन्न होतो.

आर्.टी.ई. अंतर्गत विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क सरकारने त्वरित भरावे ! – पालक संघटना

विनाअनुदानित शिक्षण संस्था २५ टक्के आरक्षणात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शुल्क वसूल करतात. त्यातून पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यामध्ये वाद होतांना दिसून येत आहेत.

कोकणात ८ ठिकाणी उभ्या रहाणार समुद्रकुटी (बीच शॅक्स)

कोकणातील स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘बीच शॅक्स’ उभारण्यात येणार आहेत. स्थानिक व्यक्तींना यात ८० टक्के जागा राखीव असतील.

सातारा येथे जावयाकडून चुलत सासर्‍यांची निर्घृण हत्या !

कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथे भूमीच्या वादातून रवी यादव यांनी त्याचे चुलत सासरे म्हणजे सुनील शंकर भोईटे यांची गोळ्या घालून हत्या केली आहे.

कारसेवकांना जाळणार्‍या ८ दोषींना सर्वोच्च न्यायालायकडून जामीन

वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीच्या घटनेतील दोषी असणार्‍या ८ धर्मांध मुसलमानांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.