‘हिंदु मित्रांशी का बोलतेस ?’, असे म्‍हणत धर्मांधांची मुसलमान तरुणीला मारहाण !

केवळ हिंदु तरुणांसमवेत फिरते म्‍हणून मारहाण करणारे धर्मांध हिंदु मुलींना लव्‍ह जिहादच्‍या जाळ्‍यात ओढण्‍यासाठी प्रयत्नशील असतात !

विश्रामबाग येथील स्‍वातंत्र्यवीर सावरकर शाळेत उन्‍हाळी शिबिराचे आयोजन !

विश्रामबाग येथील स्‍वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्‍ठान प्रशाला आणि ‘शोतोकॉन कराटे-दो फेडरेशन ऑफ महाराष्‍ट्र’ या संस्‍थेच्‍या वतीने १ ते ११ मे असे १० दिवस उन्‍हाळी व्‍यक्‍तिमत्त्व शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे.

नागपूर येथे ८ सहस्र चौरस फूट जागेवर उभे रहाणार संत जगनाडे महाराज यांचे स्‍मारक !

नागपूर येथील जगनाडे चौक येथे ८ सहस्र चौरस फूट जागेवर संत जगनाडे महाराज यांच्‍या भव्‍य स्‍मारकाची निर्मिती करण्‍यात येणार आहे.

स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या विरोधातील वक्‍तव्‍यप्रकरणी प्रणिती शिंदे यांनी क्षमा मागावी !

प्रणिती शिंदे यांनी क्षमायाचना करावी, अशी मागणी हिंदु राष्‍ट्र सेनेचे शहर प्रमुख रवि गोणे यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी विलास पोतू, आनंद मुसळे, सचिन जोशी, लिंबाजी जाधव आदी उपस्‍थित होते.

करमाळा तालुक्‍यातील (सोलापूर) श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्‍यावर प्रशासकाची नियुक्‍ती !

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्‍यावर सध्‍या बागल गटाची सत्ता होती. ‘आदिनाथ कारखाना बारामती अ‍ॅग्रो’ला भाडेतत्त्वावर देण्‍याची प्रक्रिया रहित करून कारखाना सहकारी तत्त्वावर ठेवण्‍यात आला होता

सोलापूरची ऑक्‍सिजन पातळी वाढवण्‍यासाठी ५०० एकर भूमीवर उभारणार वनउद्यान !

सोलापूर शहरातील ऑक्‍सिजनची पातळी वाढवण्‍यासाठी शहरातील ५०० एकर वनभूमीवर वनउद्यान उभारण्‍यात येणार असल्‍याची घोषणा राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य आणि मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर येथे तरुणीवर २ वर्षांपासून अत्‍याचार करणार्‍या धर्मांधाला अटक !

शाळेत मुलाखतीला गेलेल्‍या तरुणीला ओळखीच्‍या धर्मांधाने वडापाव आणि पिण्‍याचे पाणी यांतून गुंगीचे औषध देऊन घरी नेले. त्‍यानंतर तरुणीवर अत्‍याचार करत अश्‍लील व्‍हिडिओ सिद्ध केला.

नाशिक येथे वीज अभियंता ४० सहस्रांची लाच घेतांना अटक !

घोटी आणि वैतरणा भागातील एका उद्योजकाला वीज मीटरवर वाढीव भार संमत करून देण्‍याच्‍या मोबदल्‍यात ४० सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारणारे वीज वितरण आस्‍थापनाचे साहाय्‍यक अभियंताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक केली.

अत्यंत अस्वच्छता, मोकाट जनावरे, इमारतीची दुरवस्था यांसह अनेक समस्या असलेले अक्कलकोट बसस्थानक !

स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी केवळ महाराष्ट्र आणि कर्नाटक येथूनच नाही, तर संपूर्ण भारतभरातून भाविक येतात, त्या अक्कलकोट बसस्थानकाची स्थिती अत्यंत वाईट आहे.