चंद्रपूर येथे चंदनाची १ सहस्र झाडे जळून खाक !

जिल्ह्यातील मांगली देवतळे येथील एका शेतकर्‍याच्या शेतातील चंदनाची  १ सहस्र झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. जयंत नौकरकार असे शेतकर्‍याचे नाव आहे. दुपारच्या वेळेत अचानक आग लागून ही सर्व झाडे आणि ठिबक सिंचन यंत्रणा जळून खाक झाली आहे.

पाकिस्तानमध्ये निःशुल्क शिधावाटपाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जण ठार

रमझानच्या निमित्ताने सरकारकडून गरिबांना अन्नधान्य वाटप केले जात होते. त्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जण ठार झाले. ही घटना एका कारखान्याच्या आवारात घडली.

रा.स्व. संघाची तुलना कौरवांशी केल्यावरून राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका

राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना कौरवांशी केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात हरिद्वार येथील द्वितीय न्यायदंडाधिकारी यांच्याकडे याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाकडून अन्नपदार्थांचे नमुने पडताळणीसाठी कह्यात !

चैत्रोत्सवानिमित्त येथील सप्तश्रृंग गडावर दर्शनासाठी लाखो भाविक येत असल्याने प्रसादाची मागणी वाढली आहे. अनेकदा विक्रेत्यांकडून प्रसादात भेसळ करण्याचे प्रकार वाढत आहेत.

पाकिस्तानमध्ये शीख व्यापार्‍याची हत्या !

स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे आणि त्यासाठी पाकिस्तानशी संगनमत करणारे खलिस्तानवादी पाकमधील असुरक्षित शिखांसाठी आवाज उठवणार का ?

(म्हणे) ‘रामनवमीच्या काळातील हिंसाचारामागे भाजपच !’ – ममता बॅनर्जी यांचा फुकाचा आरोप

हिंसाचार धर्मांध मुसलमानांनी घडवून आणल्याचे धडधडीत दिसत असतांना त्याचे खापर भाजपवर फोडून धर्मांधांना खूश करणार्‍या ममता बॅनर्जी. भारतातील एका राज्यात अशा मुख्यमंत्री लाभणे, ही शोकांतिका म्हणावी लागेल !

भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी सुमंगला शेवडे यांचे निधन

भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी,  राष्ट्रीय व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या मातोश्री आणि डॉ. परिक्षित शेवडे यांच्या आजी सौ. सुमंगला शेवडे यांचे १ एप्रिल या दिवशी चेंबूर (मुंबई) येथे सकाळी १० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.

अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश करतांना झालेल्या दुर्घटनेत ८ जण ठार

एका नौकेद्वारे कॅनडातून अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या २ कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये भारतियांचाही समावेश आहे.

महावितरणच्या माजी अभियंत्याकडून उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट !

राज्यात वीज दरवाढ होण्याचे संकेत असतांना प्रस्तावित वीज शुल्कवाढीला महावितरणचे माजी अभियंता अजित देशपांडे यांनीच छत्रपती संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट करून आव्हान दिले आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर निर्णय लवकरच ! – केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सांस्कृतिक विभाग सकारात्मक आहे. मराठी भाषेला गौरवशाली आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. मराठी भाषांचे शिलालेख, कोनशिला, ताम्रलेख, पुरातन साहित्य आणि वस्तू पुरातत्व विभागाकडे उपलब्ध आहेत.