अमित शहा यांच्या गोवा दौर्‍याची सिद्धता अंतिम टप्प्यात

फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात दुपारी ४ वाजता होणार्‍या सभेत गृहमंत्री अमित शहा गोमंतकियांना संबोधित करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍याची सिद्धता युद्धपातळीवर चालू असून ती अंतिम टप्प्यात पोचली आहे.

कर्नाटककडून कळसानंतर आता भंडुरा प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण

कर्नाटक सरकार या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून गोव्याची जीवनदायिनी म्हणून गणल्या गेलेल्या म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमधील मलप्रभा नदीत वळवण्याच्या सिद्धतेत आहे. कर्नाटक सरकार धरण बांधून भंडुरा नाल्याचे २.१८ टी.एम्.सी. पाणी मलप्रभा नदीत वळवणार आहे.

हिंदू हे धर्म विसरल्याचाच हा परिपाक !

‘धर्मांधांना त्यांच्या धर्माकडून शक्ती मिळते; म्हणून ते धर्मासाठी आत्मसमर्पणही करतात. याच्या उलट हिंदू हे धर्म विसरल्यामुळे त्यांना काडी इतकीही किंमत (शक्ती) नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हलाल प्रमाणपत्र भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठे संकट ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक मोठे संकट असून बहुतांश लोकांना या संकटाविषयी माहितीही नाही. त्यामुळे प्रत्येकाने याचा वैध मार्गाने विरोध केला पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कतरास (झारखंड) अन् हावडा (बंगाल) येथे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी मंदिरांमध्ये साकडे आणि प्रतिज्ञा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्वास्थ्य चांगले रहावे, यासाठी कतरासमधील (झारखंड) संकटमोचन मंदिर, सूर्य मंदिर आणि हनुमान मंदिर, तसेच हावडा (बंगाल) येथील चॅटर्जी हाट येथील बोरो मां सेवालय मंदिर या सर्व ठिकाणी देवतांना साकडे घालण्यासह हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना करण्यात आली.

गुंडगिरीचा सोक्षमोक्ष !

गुंडांचे साम्राज्य उद्ध्वस्त करून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे अपेक्षित !

श्‍लोक आणि स्तोत्रे यांचे महत्त्व जाणा !

केवळ तंत्रज्ञानाच्या बळावर प्रगती होत नाही. त्याला धर्मबळाचीही आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन भावी पिढी घडवण्यासाठी पालकांनी प्रथम धर्मात सांगितलेले श्‍लोक, प्रार्थना, स्तोत्रे अर्थासहित शिकून घेऊन मुलांनाही शिकवावीत.

हाजीपूर (बिहार) येथे सनातन संस्थेच्या वतीने आनंदी जीवनासाठी अध्यात्म विषयावर प्रवचन पार पडले !

पाटलीपुत्र जिल्ह्यातील सारणच्या हाजीपूर येथे आनंदी जीवनासाठी अध्यात्म विषयावर प्रवचन घेण्यात आले. हे प्रवचन सनातन संस्थेच्या साधिका सौ. सानिका सिंह यांनी घेतले.

काँग्रेस सरकारच्या निष्क्रीयतेमुळे झालेला उद्रेक जाणा !

बेमेतरा (छत्तीसगड) येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केल्यामुळे एका हिंदु तरुणाचा मृत्यू झाला होता. आता येथे विश्व हिंदु परिषदेने लोकांना मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ दिल्याचा एक व्हिडिओ प्रसारित होत आहे.

पाकचे साधे नाव घ्यायलाही घाबरणारा भारत !

काही देश आतंकवाद्यांशी हातमिळवणी करत आहेत. अशा देशांना त्यांच्या या कृत्यांसाठी उत्तरदायी ठरवले पाहिजे, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकचे नाव न घेता केली.