मुंबईमध्ये तस्करांकडून २१ कोटी रुपयांचे सोने जप्त !

सोने तस्करांना वेळच्या वेळी कठोर शिक्षा न केल्यानेच असे प्रकार वारंवार घडत आहेत !

नसरापूर (पुणे) येथे पुरातन मंदिरातील महादेवाच्या पिंडीची विटंबना !

नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘कोणत्याही अफवेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये’, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

‘नमामि गोदा’ प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी नदी स्वच्छ करण्याचा मानस !

गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी या प्रकल्पाचा मोठा वाटा असणार आहे. यातून गोदावरी नदीत जाणारे दूषित पाणी रोखले जाणार आहे. वाराणसी येथील गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी राबवण्यात आलेला प्रकल्प नाशिक येथे राबवला जाणार आहे.

आर्.टी.ई.चे सर्व्हर ठप्प असल्याने प्रवेश खोळंबले !

शिक्षणाचा अधिकार (‘आर्.टी.ई.’) अंतर्गत शासनाच्या वतीने प्रवेश अर्ज ऑनलाईन भरून घेतले जातात; मात्र आर्.टी.ई.चे सर्व्हर चालत नसल्याने, तसेच संकेतस्थळही संथगतीने चालत असल्याने प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल का ?

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ८ टन गोमांस पकडले; २ धर्मांधांविरोधात गुन्हा नोंद !

खासगी टेंपोतून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून मुंबई येथे पहाटे गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती गोरक्षक शिवशंकर राजेंद्र स्वामी यांना मिळाली होती. त्यानुसार गोमांसाची वाहतूक करणार्‍या टेंपोचालकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.

ज्येष्ठ निरुपणकार पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र प्रसारित करून शासनाच्या विरोधात प्रसार !

‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ निरुपणकार पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे सामाजिक माध्यमांवर बनावट पत्र प्रसारित करून त्याद्वारे राज्यातील शिवसेना-भाजप युती शासनाच्या विरोधात प्रसार केला जात आहे.

पर्यटन विकासात योगदान द्या, प्रतिमास ३५ सहस्र रुपये शिष्यवृत्ती मिळवा !

राज्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांना महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडून प्रतिमास ३५ सहस्र रुपये शिष्यवृत्ती आणि ५ सहस्र रुपये प्रवासभत्ता दिला जाणार आहे.

सार्वजनिक ग्रंथालये आणि वाचन संस्कृती यांच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी ६० टक्के अनुदानवाढीचा तातडीने निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील १० सहस्र ९१८ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मिळाला आहे.

सांगली येथील सनातन संस्थेच्या साधिका प्रा. डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे यांची ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठा’च्या होमिओपॅथी अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी निवड !

जयसिंगपूर येथील ‘डॉ. जे.जे. मगदूम होमिओपॅथी मेडिकल महाविद्यालया’च्या ‘ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन अँड फिलॉसॉफी’ विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे यांची नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या होमिओपॅथी अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली आहे.

आद्यशंकराचार्यांचा जयंती उत्सव ३० एप्रिलपासून ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी

श्रीमद्जगदगुरु शंकराचार्य पीठाच्या आद्यशंकराचार्यांचा २ सहस्र ५३१ वा जयंती उत्सव ३० एप्रिल ते ५ मे या कालावधीत होत आहे. यात हवन, पूर्णाहुती, कीर्तन, प्रवचन यांसमवेत धर्माची पताका उंचावण्यासाठी हातभार लावणार्‍या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल.