स्वयंपाकासाठी वापरण्यात येणार्‍या गॅसचा वापर रिक्शा चालवण्यासाठी होत असल्याचे उघड !

स्वयंपाकगृहामध्ये वापरण्यात येणार्‍या गॅसच्या टाकीमधील गॅस अवैधपणे रिक्शामध्ये भरतांना पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी नितीन यादगिरी, जाफर ईस्माईल कारगिर, आदिल रफिक शेख आणि विजय गणपा या चौघांच्या विरोधात वळसंग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा विकास करणार ! – छत्रपती उदयनराजे भोसले

१० एप्रिल या दिवशी संगम माहुली येथील महाराणी येसूबाई यांच्या समाधीचे दर्शन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतले. यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यागपत्र द्यावे ! – उद्धव ठाकरे गट

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात शिवसेनेचा काही संबंध नव्हता, असे वक्तव्य केले होते.

तुर्भे येथे गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे हाल; माजी नगरसेवकांनी पुरवले पाण्याचे टँकर

माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील आणि कविताताई पाटील यांना याविषयी माहिती मिळताच त्यांनी तत्काळ शुद्ध पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. त्यामुळे तुर्भेकरांना मोठा दिलासा मिळाल्याने तुर्भेकरांनी त्यांचे आभार मानले.

कोल्हापूर जिल्ह्यातील १ सहस्र ग्रामपंचायतींना विकासासाठी ४८ कोटी रुपयांचा निधी वर्ग !

जिल्ह्यातील १ सहस्र १५ ग्रामपंचायतींना गेल्या आर्थिक वर्षातील १५ व्या वित्त आयोगातील निधीचा दुसरा हप्ता ४७ कोटी ७२ लाख १० सहस्र रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंडवडच्या (पुणे) सायबर विभागाकडून दिग्गज नेत्यांचे छायाचित्र, व्हिडिओ ‘मॉर्फ’ करणार्‍या धर्मांधाला अटक !

दिग्गज नेत्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ ‘मॉर्फ’ करून ते ‘यू ट्यूब’वर प्रसारित करणार्‍या शमीम अन्सारी याला पिंपरी-चिंचवडच्या सायबर विभागाने अटक केली आहे. शमीम याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे व्हिडिओ अश्लील स्वरूपात ‘मॉर्फ’ केले होते.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना हा शेतकरी सभासदांचाच राहील ! – अमल महाडिक, माजी आमदार, भाजप

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे निरर्थक आरोप करत आहेत. हा कारखाना गेली २८ वर्षे आम्ही लोकशाही पद्धतीने चालवत आहे.

श्री विठ्ठलाच्या नित्यपूजेची वर्ष २०२३ अखेरपर्यंतची नोंदणी पूर्ण !

नोंदणी करून ठरलेल्या दिनांकाला संबंधित भाविक आणि त्यांचे १० ते १२ कुटुंबीय यांना नित्यपूजेसाठी मंदिरात प्रवेश दिला जातो. नित्यपूजा चालू असतांना देवाच्या मूर्तीवर केशर पाण्याने स्नान घालण्याची संधी भाविकांना मिळते.

विश्व हिंदु परिषदेने विझवला श्रीजानाई-मळाई डोंगरावरील वणवा !

खिंडवाडी गावचे आराध्यदैवत श्रीजानाई-मळाईदेवीच्या डोंगरावर अचानक वणवा लागला होता. तब्बल ५ घंट्यांच्या अथक परिश्रमानंतर विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना हा वणवा विझवण्यात यश मिळाले.

पुणे येथे अवैधरित्या चालणार्‍या रिक्शा वाहतुकीकडे वाहतूक पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष !

राजरोसपणे चालू असलेल्या अवैध रिक्शा वाहतुकीवर कारवाई का केली जात नाही ? अशा प्रकारे अवैध वाहतूक चालू ठेवणार्‍यांनाही कठोर शिक्षा होणे आवश्यक !