समलैंगिक विवाहांचा विषय न्यायालयाने नव्हे, तर संसदेने हाताळावा ! – केंद्रशासन

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असतांना केंद्र शासनाने म्हटले आहे की, अशी अनेक सूत्र आहेत. ती संसदेपुढे गेली, तर बरे होईल. संसदेत प्रतिष्ठित खासदार आहेत. संसदीय समित्यांमध्ये सर्व पक्षांचे सदस्य आहेत.

देऊर (जिल्‍हा सातारा) येथे रानडुकराच्‍या शिकारीसाठी भूमीत पुरलेल्‍या जिलेटिनच्‍या स्‍फोटात एकजण गंभीर घायाळ !

रानडुकराच्‍या शिकारीसाठी भूमीत पुरलेल्‍या जिलेटिनच्‍या स्‍फोटात एक शेतकरी घायाळ झाला आहे. त्‍याला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे.

मुंबईतून जप्‍त केलेले १ सहस्र किलो अंमली पदार्थ नष्‍ट !

अंमली पदार्थांची होणारी तस्‍करी कायमचीच रोखण्‍यासाठी काय प्रयत्न करणार ? हे पोलिसांनी सांगावे !

पिंपरी (पुणे) येथील रावेत भागात वादळी वार्‍यामुळे होर्डिंग्‍ज कोसळल्‍याने ६ जणांचा मृत्‍यू !

रावेत भागात झालेल्‍या मुसळधार पावसामुळे ‘होर्डिंग्‍ज’ कोसळून ६ जणांचा मृत्‍यू झाला असून ३ जण घायाळ झाले आहेत.

एकाही हिंदु व्‍यापार्‍यावर आक्रमण झाले, तर जशास तसे उत्तर देऊ ! – भाजपचे आमदार नितेश राणे यांची चेतावणी

नगर येथील हिंदु व्‍यापार्‍यांवर झालेल्‍या आक्रमणाचे प्रकरण. येथे जिहाद्यांनी केलेले अतिक्रमण आणि त्‍यांची दादागिरी पुष्‍कळ वाढलेली आहे. त्‍यामुळे येथील हिंदु व्‍यापार्‍यांवर मुख्‍य बाजारपेठ सोडून जाण्‍याची वेळ आलेली आहे

हिंदु एकता आंदोलनाच्‍या वतीने शिवजयंती उत्‍सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

शिवप्रेमींनी आपल्‍या परिसरात शिवकालीन देखावे, भगव्‍या पताका, ध्‍वज लावण्‍याचे, तसेच २३ एप्रिल या दिवशी निघणार्‍या ऐतिहासिक दरबार मिरवणुकीत मोठ्या संख्‍येने उपस्‍थित रहाण्‍याचे आवाहन संघटनेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

मुंबईमध्‍ये मशिदींवरील अवैध भोंग्‍यांचा प्रश्‍न अद्यापही बिकट !

सर्वोच्‍च आणि उच्‍च न्‍यायालय यांनी धार्मिक वास्‍तूंवरील अवैध भोंगे हटवण्‍याविषयी वेळोवेळी दिलेले निर्देश, तसेच काही मासांपूर्वी मशिदींवरील अवैध भोंग्‍यांच्‍या विरोधात मनसेने उभारलेले जनआंदोलन यानंतरही मुंबईतील अवैध भोंग्‍यांचा प्रश्‍न कायम आहे.

सातारा येथे आनंदाचा शिधा वाटपास प्रारंभ !

औद्योगिक वसाहतीमधील शिधावाटप दुकानदार पिंगळे यांच्‍या दुकानातील ग्राहकांना आनंदाचा शिधा वाटण्‍यास प्रारंभ करण्‍यात आला. पुरवठा विभागाचे उपायुक्‍त त्रिगुण कुलकर्णी यांच्‍या हस्‍ते हे वाटप करण्‍यात आले.

माझ्‍याविषयी आणि सहकारी यांच्‍याविषयी दाखवत असलेल्‍या वृत्तांमध्‍ये तथ्‍य नाही! – अजित पवार, राष्‍ट्रवादी काँग्रेस

गेल्‍या काही दिवसांपासून अजित पवार आणि त्‍यांचे ४० सहकारी राष्‍ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून सत्ताधार्‍यांना पाठिंबा देणार असल्‍याची वृत्ते प्रसिद्ध होत आहेत. त्‍या संदर्भात अजित पवार यांनी पत्रकारांसमोर ही भूमिका मांडली.

वाडी (जिल्‍हा नागपूर) येथे नगर परिषदेच्‍या कार्यालयात मनसेच्‍या कार्यकर्त्‍यांकडून तोडफोड !

वाडी नगर परिषदेच्‍या क्षेत्रातील नाली बांधकाम, रस्‍त्‍याची कामे आणि मैदानाची प्रलंबित कामे यांकडे लक्ष वेधण्‍यासाठी मनसेचे काही पदाधिकारी नगर परिषदेच्‍या कार्यालयात गेले होते.