कु. चैतन्या चंद्रकांत राऊत हिला शाळेतील स्पर्धांमध्ये यश !

एस्.एस्. समिती प्राथमिक शाळेत झालेल्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये कु. चैतन्या चंद्रकांत राऊत हिने यश संपादन केले आहे. सनातनचे साधक श्री. चंद्रकांत राऊत यांची ती मुलगी आहे.

हिंदु राष्ट्र संकल्पना असंविधानिक ठरवू पहाणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंवरील वाढत्या आघातांच्या घटना पहाता हिंदु राष्ट्र संकल्पना असंविधानिक ठरवू पहाणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रांतीय हिंदु अधिवेशनाच्या माध्यमातून प्रयत्न करूया. यापुढे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येक पाऊल टाकणे आवश्यक आहे.

आता राज्यातील भटक्या मांजरींची नसबंदी केली जाणार; शासनाने काढला आदेश !

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांना पकडून नसबंदी करण्यात येत असते; मात्र आता राज्यातील मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि भटक्या मांजरींचा उपद्रव अल्प करण्यासाठी  मांजरींची नसबंदी अन् लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

मध्यप्रदेशात वादग्रस्त वेब सिरीजवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न करणार ! – शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री

वेबसिरीजसाठी केंद्र सरकारने काही नियमावली प्रसारित केली आहे; मात्र त्याला केराची टोपली दाखवली जाते. एकेका राज्याने अशी बंदी घालण्याऐवजी केंद्राने त्यांच्या विरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक !

द्रोणागिरी आश्रमात (जिल्हा कोल्हापूर) हनुमान जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी !

हनुमान जयंतीच्या निमित्ताने पहाटेपासून अभिषेक, प्रवचन, आरती, जप, गजर करण्यात आला. पहाटे ६.३१ वाजता भाविकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने पलूस येथे शोभायात्रा !

श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने श्री धोंडिराज मंदिर येथे ३० मार्चला श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला, तसेच शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

द्वारकेमध्येही ‘देवभूमी कॉरिडॉर’ (सुसज्ज मार्ग) उभारण्यात येणार !

वाराणसीतील काशी विश्‍वनाथ, उज्जैन येथील ‘महाकाल लोक’ आणि मथुरा कॉरिडॉर (सुसज्ज मार्ग) यानंतर आता द्वारकेत ‘देवभूमी कॉरिडॉर’ होणार आहे.

भाजप कव्वालीच्या माध्यमातून सरकारची कामे मुसलमानांपर्यंत पोचवणार !

भाजपने मुसलमानांना कितीही जवळ केले, तरी ते भाजपला मते देणार नाहीत. त्यामुळे भाजपने हिंदूंना जवळ करून त्यांचा विश्‍वास संपादन केल्यास हिंदू भाजपला भरघोस मतांनी निवडून देतील, हे निश्‍चित !

‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्र नव्हे, तर शास्त्र किंबहुना शस्त्र आहे ! – प्राचार्य डॉ. मनोज कामत

‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून एक दैवी आणि आध्यात्मिक शक्ती घरात प्रवेश करतांनाची अनुभूती प्रत्येक वाचकाला येते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रज्वलित केलेला हा नंदादीप आहे. धर्मतेज आणि क्षात्रतेज या दोन्हीचे सार यात सामावलेले आहे !

केरळमध्ये धावत्या रेल्वेत प्रवाशांना पेटवून देण्याच्या प्रकारामागे आतंकवादी संघटनांचा हात !

आतंकवादी समाजविघातक कृत्ये करण्यासाठी विविध हातखंडे राबवत आहेत, हेच यातून दिसून येते. अशा आतंकवादी संघटनांची पाळे-मुळे नष्ट करणे आवश्यक !