मुंबई – कर्नाटकमध्ये होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुसलमानांची मते मिळावीत, यासाठी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्यात येत आहे. देशावर विविध संकटे असतांना या स्थितीत असे राजकारण हानीकारक आहे. राष्ट्रपुरुषांचा उपयोग निवडणुकीसाठी करू नये, असे वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी ए.एन्.आय्. या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.
#WATCH| “He(Rahul Gandhi) keeps making comments on Savarkarji………This is being done because of the upcoming Karnataka elections, to polarise the Muslim voters……..”:Ranjit Savarkar, Grandson of Veer Savarkar on Rahul Gandhi pic.twitter.com/JsMSyzsIdv
— ANI (@ANI) April 13, 2023
या वेळी श्री. रणजित सावरकर म्हणाले, काँग्रेसचे नेते वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी टिपणी करत आहेत. सावरकरांचे हिंदुत्व त्यांना समजलेले नाही. सावरकर यांचे हिंदुत्व कोणत्या पूजापद्धतीवरून नाही, तर राष्ट्रीयत्वावर आधारित आहे. हिंदूंनी काँग्रेसच्या जाळ्यात येऊ नये.