बनावट औषधे बनवणार्‍या १८ फार्मा आस्थापनांचे परवाने रहित !

जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

मुंबई ते ठाणे प्रवास सिग्नलविना होणार !

मानखुर्दवरून ठाणे दिशेकडील १.२३ कि.मी. लांबीच्या दोन पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ११ जून या दिवशी होणार !

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र आळंदी येथून ११ जून या दिवशी प्रस्थान होणार आहे.

गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने नाकारला !

मुंबई येथील घरी नजरकैदेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने नाकारला आहे.

वेद आणि पुराणे यांचा अभ्यास केल्याचे वेगळे श्रेयांक गुण दिले जाणार ! – विद्यापीठ अनुदान आयोग

विद्यार्थ्यांना वेद, पुराणे, मीमांसा, धर्मशास्त्र, ज्योतिष, वेदांग इत्यादी भारतीय ज्ञान परंपरांच्या विविध शाखांचा अभ्यास केल्यास वेगळे श्रेयांक गुण दिले जाणार आहेत.

पिसोळी (जिल्हा पुणे) येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित !

नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी असलेली महापालिका आता तरी तिचा कारभार सुधारेल का ?

सर्वाधिक प्रदूषित नदीपात्रे महाराष्ट्रात !

केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होऊनही त्याचा वापर नदीपात्रांचे प्रदूषण अल्प करण्यासाठी न होणे संतापजनक !

सातारा शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे !

शहरातील गोडोली जलाशयात (तळ्यात) हिंदवी स्वराज्य संवर्धक तथा स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयजराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

चंद्रपूर जिल्हाधिकार्‍यांचा मद्याची दुकाने बंद करण्याचा आदेश उच्च न्यायालयाकडून रहित !

चंद्रपूर लिकर असोसिएशनचे अध्यक्ष राजू मारकवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट करून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला आव्हान दिले. त्यानंतर उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती खंडपिठाने आदेशाला स्थगिती देत आदेश रहित ठरवला आहे

राज्य सरकारने पत्रकारांच्या बंद केलेल्या सुविधा तातडीने चालू कराव्यात ! – डॉ. किशोर पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, कोकण विभागीय सचिव

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून गोवा, देहली, बेळगाव, गुजरात आणि महाराष्ट्र या ५ राज्यांमध्ये पत्रकार वृत्तसंकलनाचे कार्य करत असतात. शासनाने पत्रकारांना दिलेल्या सुविधा बंद केल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.