महाराष्ट्रातील युवकांना जर्मनीत रोजगाराची संधी !

जर्मनीमध्ये प्रतिवर्षी विविध कौशल्ये असलेल्या किमान ४ लाख प्रशिक्षित लोकांची कमतरता भासते. जर्मनीची मनुष्यबळाची ही आवश्यकता महाराष्ट्र पूर्ण करू शकतो, अशी अपेक्षा जर्मनीचे वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे व्यक्त केली.

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) महावितरण कार्यालयाच्या दारात करवीर शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने !

अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट असतांनाही उंचगावमधील वीज वितरण शाखेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी मार्चचे कारण सांगून वीजवसुली करतांना त्यांची वीज बंद करत होते.

निकाल लवकर घोषित करण्यासाठी उत्तरपत्रिकांची आता ‘ऑनलाईन’ पडताळणी !

परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी वेगाने होऊन निकाल लवकर घोषित करण्यासाठी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने घेतला आहे.

राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांचे सरकार रामायणाशी संबंधित ठिकाणे ओळखून त्यांना पर्यटन स्थळे बनवण्यासाठी मोठ्या योजनेवर काम करत आहे

श्रीलंका रामायणातील घडामोडींची साक्ष देणार्‍या स्थळांचा विकास करणार !

कुठे रामायणाशी निगडीत स्थळांचा विकास करणारा श्रीलंका, तर कुठे श्रीरामाला काल्पनिक ठरवून रामसेतू तोडायला निघालेले हिंदुद्वेषी तत्कालीन काँग्रेस सरकार !

श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे दरीत कोसळलेल्या १३ भाविकांना वर काढण्यात यश !

सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणार्‍या फलटण तालुक्यातील श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेवाची यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रेमध्ये मुंगी घाटातून कावड वर नेत असतांना १३ भाविक दरीत कोसळून घायाळ झाले.

रोशनी शिंदे यांची प्रकृती स्थिर ! – डॉ. उमेश आलेगावकर

रोशनी शिंदे यांना गंभीर इजा झालेली नाही. त्यांना मुका मार लागला आहे. अंतर्गत रक्तस्राव झालेला नाही. तसेच त्या गर्भवतीही नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉ. उमेश आलेगावकर यांनी दिली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना येथे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

विश्‍वविख्यात चन्नकेशव देवालयाच्या रथोत्सवाच्या आरंभी कुराण पठण करण्याची प्रथा बंद !

काही वर्षांपासून रथासमोर कुरान पठण केल्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ होण्याची कुप्रथा पडली होती. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करून अंदोलन केल्यावर राज्य धर्मादाय विभागाने ‘देवालयाच्या रथासमोर कुराण पठण करता येणार नाही’, असे सांगितले.

गडहिंग्लज शहरासाठी ४६ कोटी ६० लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना संमत !

भारत सरकारपुरस्कृत ‘अमृत मिशन २’अंतर्गत महाराष्ट्र शासनाने ‘हर घर नल, हर घर जल’ या धोरणानुसार गडहिंग्लज शहरासाठी भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने ४६ कोटी ६० लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना संमत केली आहे.

शासकीय उच्च कला परीक्षेवर कला महाविद्यालय महाराष्ट्र संघाचा बहिष्कार !

राज्यातील कला महाविद्यालय महाराष्ट्र संघाच्या वतीने उच्च कला अभ्यासक्रम, अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या विनाअनुदानित चित्रकला संस्था, प्रवेश प्रक्रिया अशा विषयांशी निगडित विविध मागण्या सातत्याने करण्यात येत आहेत

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून ९ मासांत ६ सहस्र २०० जणांना अर्थसाहाय्य !

नवीन सरकार स्थापन झाल्यापासून ९ मासांत राज्यातील ६ सहस्र २०० नागरिकांना ५० कोटी ५५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाद्वारे देण्यात आली आहे.