हिंदु जनजागृती समिती आणि ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’ यांच्या पुढाकारातून सिंहगडावर स्वच्छता मोहीम !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सिंहगडावर १ एप्रिल या दिवशी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मोहिमेत ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’ येथील शिवप्रेमी सहभागी झाले होते. गडावरील कोंढाणेश्वर मंदिर, देव टाक, अमृतेश्वर मंदिर तसेच कल्याण दरवाजा तटबंदी, हत्ती तलाव, नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक…

राज्यात पुन्हा वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता !

राज्यामध्ये नगर, लातूर, धाराशिव, नांदेड, संभाजीनगर, परभणी, जळगाव, बुलढाणा, जालना, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या दृष्टीने दक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे.

राज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांचे बेमुदत कामबंद आंदोलन !

राज्यभरातील २ सहस्र २०० नायब तहसीलदार आणि ६०० तहसीलदार यांनी ३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.

सावरकरांविषयी अचानकपणे विरोध पहाण्यास मिळतो ! – प्रिया बेर्डे, प्रदेशाध्यक्षा, सांस्कृतिक विभाग

आपण सर्वजण लहानपणापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी वाचत आलो आहोत; पण अचानकपणे सावरकरांविषयी विरोध पहाण्यास मिळतो. हे पाहिल्यावर धक्का बसतो; पण समाजात विरोधाला विरोध करणे, ही एक वृत्ती झाली असून त्या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करते,

कर्जत (रायगड) येथे आढळली १०० हून अधिक गोवंशियांची कातडी !

कर्जत तालुक्यातील नेरळ-ममदापूर-धामद ग्रामपंचायत क्षेत्रातील एका पठारावर हत्या केलेल्या गोवंशियांची फेकून दिलेली कातडी आढळली आहे. या कातड्यांची संख्या १०० हून अधिक आहे. येथील ‘महाराष्ट्र न्यूज २४’ या स्थानिक वेबपोर्टलवर व्हिडिओसह याविषयीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु अधिवेशन म्हणजे धर्मयज्ञाचे धगधगते यज्ञकुंड ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हे अधिवेशन असले तरी हा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या धर्मयज्ञाचे धगधगते यज्ञकुंड आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये संघभाव निर्माण होऊन ‘संघेशक्ती: कलौयुगे ।’या धर्मवचनाप्रमाणे धर्मावर होणार्‍या आघातांचा संघटितपणे विरोध करण्याची दिशा निश्चित करण्यासाठी हे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आहे,

विश्व हिंदु परिषद, बजरंग दल गोरक्षा विभागाकडून एकाच दिवशी ३ ठिकाणी गोरक्षणाची कार्यवाही !

विश्व हिंदु परिषद, बजरंग दल गोरक्षा विभागाचे जिल्हाप्रमुख श्री. प्रशांत परदेशी यांना मिळालेल्या माहितीनुसार ३ ठिकाणी कारवाई करत गोवंशियांना जीवदान देण्यात आले.

राहुल गांधी यांना शिक्षेच्या प्रकरणी जामीन संमत

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वर्ष २०१९ मध्ये एका सभेत ‘मोदी आडनावेचे सगळे जण चोर असतात’, असे विधान केल्याच्या प्रकरणी त्यांना सुरत सत्र न्यायालयाने २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

मुसलमान प्रियकराने हिंदु प्रेयसीला पेटवून स्वतःही जाळून घेतले : प्रियकराचा मृत्यू

जो खरे प्रेम करतो, तो कधी असे कृत्य करू शकत नाही. याला प्रेम नाही, तर द्वेषच म्हणतात !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील बेलेश्‍वर मंदिराच्या अवैध बांधकामावर कारवाई

बेलेश्‍वर मंदिरात श्रीरामनवमीच्या दिवशी विहिरीवरील स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महानगरपालिकाने या मंदिराचा अवैधरित्या बांधण्यात आलेला भाग पाडला.