पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – भाविकांच्या सुरक्षेसाठी पंढरपूर शहरातून पोलिसांनी पायी गस्त करावी, अशा सूचना संबंधित पोलीस अधिकार्यांना दिल्या असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. पंढरपूर हे मोठे तीर्थक्षेत्र असल्याने येथे प्रतिदिन अनुमाने ५० सहस्र भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांना लुटण्याच्या, तसेच चोरीच्या घटना घडतात, तसेच शहरात वाढलेल्या गुंडगिरीमुळे भर रस्त्यात हाणामारीचे प्रकार घडत आहेत.
या पार्श्वभूमीवर समाजकंटक, गुंडगिरी करणारे, भुरटे चोर यांच्यावर जरब बसावी, यासाठी पोलीस अधिकार्यांना सरदेशपांडे यांनी या सूचना दिल्या आहेत.