पू. गोळवलकर गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांविरोधात गुन्हा नोंद !

सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. केशव हेडगेवार यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करून ते ‘व्हॉट्सॲप’द्वारे प्रसारित केल्याप्रकरणी एन्.आर्.आय. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच पुढील चौकशी चालू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी दिली.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुखपट्टीचा (मास्क) उपयोग करणे बंधनकारक ! – रूचेश जयवंशी, जिल्हाधिकारी, सातारा

राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वसिद्धता आणि उपाययोजना करण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी सूचना केल्या आहेत.

सतत पडणारा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती !

सतत पडणारा पाऊस म्हणजे नैसर्गिक आपत्ती समजली जाईल, असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. १० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस सलग ५ दिवस पडल्यास ती नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. हा राज्य सरकारचा शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने सर्वांत मोठा निर्णय आहे.

नगरमध्ये २ गटांत दगडफेक, पोलिसांचा कडक बंदोबस्त !

येथील संभाजीनगर महामार्गावरील गजराजनगर परिसरात ४ एप्रिलला रात्री किरकोळ कारणावरून २ गटांत दगडफेक झाली आहे. या वेळी समाजकंटकांनी २ मोटारसायकल जाळत, स्विफ्ट या चारचाकीची तोडफोड केली. दगडफेकीत ५ जण घायाळ झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.

चैत्र यात्रेसाठी लाखो भाविक उपस्थित !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने भाविकांसाठी विविध सुविधा !

सातार्‍यात पोल्ट्रीमध्ये चालू असणार्‍या पशूवधगृहावर पोलिसांची धाड !

४२ गायींची सुटका, ३० वासरांचे मांस हस्तगत

मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी १९ शुद्धीकरण प्रकल्प बसवणार !

सध्या मुंबई शहर देहलीपेक्षाही सर्वाधिक प्रदूषित म्हणून ओळखले जात आहे. यावर प्रतिबंध म्हणून येथे १९ ‘प्युरिफिकेशन युनिट’ (शुद्धीकरण प्रकल्प) बसवले जाणार आहेत. त्यासमवेत धुक्याचे १४ मनोरेही (स्मॉग टॉवर्स) उभारण्यात येणार आहेत.

खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची तत्परतेने कार्यवाही करा !

कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना सुराज्य अभियानाच्या वतीने निवेदन

पालघर येथील साधू हत्याकांडाची होणारी पुनरावृत्ती टळली !

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वनई चंद्रनगर येथे २ साधू मुले पळवायला आले आहेत, अशी अफवा पसरली. ही अफवा पसरल्यानंतर नाथजोगी समाजाच्या २ साधूंवर आक्रमण होण्याच्या आधीच गावातील एका पोलीस मित्राच्या सतर्कतेमुळे त्यांनी साधूंना सुरक्षित ठिकाणी हलवले.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेला निमणी (जिल्हा सांगली) येथील नवश्या मारुति !

आज चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती ! तासगाव तालुक्यातील निमणी येथील हनुमान मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.