राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला !

जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी ३ दिवसांची समयमर्यादा देण्यात आली असून १४ एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

राज्यातील गावागावांत मिळणार वड-पिंपळ वृक्षांची छाया !

प्रत्येक जिल्ह्यातील २५ गावांमध्ये वन उद्यानांची निर्मिर्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये वड, उंबर, पिंपळ, बेल, कडुलिंब आणि देशी आंबा या वृक्षांच्या पंचायतन वन उद्यानाची निर्मिती केली जाणार आहे.

‘लेट्स चेंज’ या चित्रपटातून विद्यार्थ्यांना देण्यात येणार स्वच्छतेचे धडे !

केंद्रशासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’वर आधारित असल्यामुळे हा चित्रपट पहाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून केले आहे.

अंगणवाडी सेविकांना मिळणार नवीन भ्रमणभाष संच !

अंगणवाडी सेविकांना सरकारने भ्रमणभाष संच दिले होते; मात्र हे संच जुने झाल्याने सतत बंद पडत होते. त्यामुळे हैराण झालेल्या अंगणवाडी सेविकांनी ते भ्रमणभाष संच परत करून नवीन संच देण्याची मागणी केली होती.

पंतप्रधान मोदी यांनी उचललेल्या पावलांमुळे खलिस्तानी चळवळ कमकुवत !

अमेरिकेमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतके खलिस्तानी कार्यरत आहेत. त्यांच्यामुळे पूर्ण शीख समुदायाची अपकीर्ती होत आहे’, असे या शिष्टमंडळाने म्हटले आहे.

पुणे मेट्रोच्या कामात अनेक त्रुटी !

मेट्रो स्थानकांच्या उभारणीत अनेक त्रुटी असल्याचे शहरातील ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्याने मेट्रोस्थानकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

भारतात धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र येऊन आदर्श राष्ट्र निर्माण करणे आवश्यक ! – जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार, विदर्भ रुक्मिणी पीठ, कौंडण्यपूर

धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी एकत्र येऊन आदर्श राष्ट्र निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कौंडण्यपूर येथील विदर्भ रुक्मिणी पिठाचे जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार यांनी केले. येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात बोलत होते.

नाशिक येथील रामशेज गडावर सापडल्या ११ गुहा !

दुर्ग संवर्धकांच्या मोहिमेत अत्यंत दुर्मिळ वनस्पती आणि खोलगट अशा ११ गुहा आढळून आल्या. त्याचसमवेत या गुहांमध्ये दुर्मिळ वनौषधींसह पक्षी आढळून आले.

मध्यप्रदेशमध्ये दलित हिंदु युवतीचे बलपूर्वकने धर्मांतर करणार्‍या लव्ह जिहाद्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट

लव्ह जिहादला बळी पडल्यानंतर धर्मांतर करून आयेशा झालेल्या ऐश्‍वर्या चव्हाण हिला मुले झाली. इरशाद आणि त्याचा भाऊ मुकीम याने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला. तिने धर्मांतराला नकार दिल्यामुळे मुकीम याने तिच्यावर बलात्कार केला.