१ मेपासून विसावा मंडळाच्या ‘शिवोत्सव २०२३’ला प्रारंभ !
गेली ३६ वर्षे सातत्याने साजरा होणारा विसावा मंडळाचा शिवोत्सव १ मे या दिवशी प्रारंभ होत आहे.
गेली ३६ वर्षे सातत्याने साजरा होणारा विसावा मंडळाचा शिवोत्सव १ मे या दिवशी प्रारंभ होत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील दंगल प्रकरण आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निखिल गुप्ता यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होणे आवश्यक ! केवळ त्यांचे स्थानांतर करणे म्हणजे त्यांनी केलेल्या गुन्ह्यांना एकप्रकारे क्षमाच करणे, असे नव्हे का ?
महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’च्या सोहळ्यात उष्माघातामुळे १४ नागरिकांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी जिल्हाधिकार्यांना सूचना दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या आवारातील अवैध ‘रॅपसाँग’ चित्रीकरण, तसेच विविध मागण्यांच्या संदर्भात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी २४ एप्रिल या दिवशी विद्यापिठाच्या आवारात घोषणा देऊन आंदोलन केले होते.
स्थानिक संस्था कराच्या (लोकल बॉडी टॅक्स) प्रलंबित प्रकरणांमधून मिळणार्या किमान २०० कोटींच्या उत्पन्नावर महापालिका प्रशासनाने पाणी सोडल्याचे वास्तव समोर आले आहे.
पोलिसांनी अनुमाने १०० किलो गोमांस, तसेच ज्या रिक्शातून गोमांसाची वाहतूक करण्यात आली ती रिक्शा जप्त केली आहे.
‘महिला कुस्तीपटूंनी याचिकेत लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या सूत्रांचा विचार करणे आवश्यक आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे. आता या प्रकरणावर २९ एप्रिल या दिवशी सुनावणी होणार आहे.
पाकिस्तानमधून भारतात आलेल्या शरणार्थी हिंदूंची राजस्थानमधील जोधपूर येथील २०० घरे जोधपूर विकास प्राधिकरणाने बुलडोझर चालवून पाडून टाकली. हिंदूंचे म्हणणे आहे की, ही भूमी त्यांनी विकत घेऊन तेथे बांधकाम केले होते.
सर्वेक्षणासाठी येणारे अधिकारी आणि पोलीस यांच्या गाड्यांसमोर आंदोलक महिला आडव्या झोपल्याने प्रश्न निर्माण झाला होता. ‘सर्वेक्षण थांबवले जात नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही’, असा पवित्रा या महिलांनी घेतला.
‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महिला यांचा अवमान करण्यात आला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.