गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी राज्यशासनाकडून मान्य !

पर्यटनमंत्री श्री. लोढा यांनी स्वत: आझाद मैदानात येऊन गड-दुर्ग रक्षण समितीच्या मागण्या समजून घेतल्या. या वेळी समयमर्यादा निश्‍चित करून राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवून त्यांचे जतन आणि सवंर्धन यांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्‍वासन श्री. मंगलप्रभात लोढा यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर दिले.

राजकीय पक्षांची दु:स्थिती !

‘राजकीय पक्षांतील व्यक्ती राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार न करता केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या पक्षाचा विचार करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

महामोर्च्‍याच्‍या जनजागृतीसाठी बैठकांचे आयोजन !

३ मार्चला होणार्‍या महामोर्च्‍याच्‍या जनजागृतीसाठी बैठका घेण्‍यात आल्‍या. याला समस्‍त गड-दुर्ग प्रेमी संघटना, हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना, शिवप्रेमी यांची उपस्‍थिती लाभली. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट यांनी या वेळी मार्गदर्शन केले.

हिंदूंच्‍या धार्मिक विधींना विरोध करण्‍यासाठी डाव्‍यांचा थयथयाट !

यज्ञ हे भारतीय संस्‍कृतीचे मूलभूत धार्मिक अंग आहे. यज्ञामागील विज्ञान आणि धर्मशास्‍त्र समजून न घेणार्‍यांची बौद्धिक दिवाळखोरीच यावरून लक्षात येते. यज्ञाला विरोध करणारे एकप्रकारे हिंदु धर्मालाच विरोध करत आहेत.

(म्‍हणे) ‘डॉ. आंबेडकर यांनी फेकून दिला तो सनातन धर्म पुन्‍हा आणायचा का ?’ – जितेंद्र आव्‍हाड

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांची विधानसभेत हिंदु धर्मावर गरळओक !

निकालांचा मतीतार्थ !

हिंदूंसाठी ‘धर्म’ हे असे सूत्र आहे की, ज्‍याच्‍या जोरावर ते एकत्र येऊ शकतात. त्‍यामुळे यापुढील काळातही होणार्‍या राजस्‍थान, मध्‍यप्रदेश, कर्नाटक राज्‍यांच्‍या निवडणुकांत भाजपने हिंदुत्‍व आणि धर्म याच सूत्रावर केंद्रीत करत राष्‍ट्रवाद आणि विकासाची जोड दिल्‍यास हिंदु विरोधकांचा पराभव होण्‍यास वेळ लागणार नाही !

सोलापूर येथे ‘नित्‍योपासना’ या लघुग्रंथाचे मान्‍यवरांच्‍या उपस्‍थितीत प्रकाशन !

२६ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार भवन येथे मान्‍यवर दत्तभक्‍तांच्‍या उपस्‍थितीत ‘नित्‍योपासना’ या लघुग्रंथाचे प्रकाशन करण्‍यात आले.

कसब्‍यात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्‍या अश्‍विनी जगताप विजयी !

गेल्‍या महिन्‍याभरापासून चर्चेत असलेल्‍या कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल २ मार्च या दिवशी लागला. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्‍या आमदार मुक्‍ता टिळक यांच्‍या निधनामुळे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत.

व्‍यापार्‍यांवर अन्‍याय होऊ न देता श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील कामांचे नियोजन करा ! – राजेश क्षीरसागर, अध्‍यक्ष, राज्‍य नियोजन मंडळ

पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान समितीच्‍या विविध प्रश्‍नांबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयात कार्यकारी अध्‍यक्ष राजेश क्षीरसागर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठक घेण्‍यात आली. त्‍या वेळी या सूचना त्‍यांनी केल्‍या.

कुसुंबा (जिल्‍हा जळगाव) येथून १ लक्ष ६८ सहस्र ९०० रुपयांच्‍या बनावट नोटा पोलिसांच्‍या कह्यात !

जळगाव जिल्‍ह्यात बनावट नोटा छपाईची एका वर्षातील चौथी घटना !