खंडाळा पोलिसांच्या विरोधात यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार प्रविष्ट !

पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथील बजरंग दल कार्यकर्ता महेश बंडू सुरोशे (वय २४ वर्षे) यांनी त्यांना खंडाळा पोलिसांनी विनाकारण मारहाण केली, याविषयीची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या कार्यालयात प्रविष्ट केली आहे.

हिंदू ग्राहकांना हलाल रहित पदार्थ त्वरित उपलब्ध करून द्या ! – ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची मागणी

‘के.एफ्.सी.’सारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून १०० टक्के ‘हलाल’ प्रमाणित उत्पादनांची विक्री करण्यात येते. त्यामुळे भारतातील बहुसंख्य हिंदू आणि शीख यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.

शिवराज नाईकवाडे यांच्याकडील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा सचिवपदाचा कार्यभार काढला !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडील सचिवपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढून घेतला आहे. सध्या हा कार्यभार राधानगरीचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

खासगी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी तक्रार प्राप्त होताच कारवाई करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्यातील खासगी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. अनधिकृत सावकारांच्या विरुद्ध तक्रारी प्राप्त होताच कारवाई करण्यात येत आहे.

राज्यपालांच्या नियमांनुसार प्रशासकीय अधिकार अध्यक्षांकडेच ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

राज्यपालांनी वर्ष १९७२ मध्ये राज्य विधीमंडळ प्रशासकीय अधिकाराविषयी अध्यक्ष आणि सभापती यांची समिती सिद्ध केली आहे. विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधान परिषदेचे सभापती यांपैकी कुणी एक कामकाज पहाण्यास उपलब्ध नसेल किंवा असमर्थ असेल, तरी उर्वरित पिठासीन अधिकार्‍याला हे कामकाज पहाण्याचे अधिकार आहेत..

विमा नाकारलेल्या शेतकर्‍यांच्या प्रस्तावांची पुनर्पडताळणी करण्यात येईल ! – अब्दुल सत्तार, कृषीमंत्री

ज्या हानीग्रस्त शेतकर्‍यांचे प्रस्ताव विमा आस्थापनांनी फेटाळले आहेत, त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या प्रस्तावांची पुनर्पडताळणी करण्यात येईल. येत्या १५ दिवसांत याविषयीचा अहवाल मागवण्यात येईल, असे आश्वासन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिले.

चिपळूण येथे भूमीच्या वादातून झालेल्या गुन्ह्याचा ८ वर्षानंतर लागला निकाल

चिपळूण येथे भूमीच्या वादातून मित्राचा गळा चिरून निर्दयपणे हत्या केल्या प्रकरणी ६ जणांना सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी १० सहस्र रुपयांचा दंड अन् दंड न भरल्यास आणखी ६ महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

खलिस्तानचा खरा शत्रू भारत नाही, तर पाकिस्तान आहे !

पाकची गुप्तचर संस्था आयएस्आय अमृतपाल याचा हत्यार म्हणून वापर करत आहे; मात्र ती कायमस्वरूपी त्याचा वापर करणार नाही.

सुधीर पारदुले यांना २ दिवसांची पोलीस कोठडी

तालुक्यातील साई रिसॉर्ट वादग्रस्त प्रकरणी उद्योजक सदानंद कदम, प्रांताधिकारी जयराम देशपांडे आणि आता तत्कालीन बुरोंडी विभागाचे मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांना १५ मार्च या  दिवशी येथील पोलिसांनी अटक केली आहे.

‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’चा आतंकवादी आरिफ हुसेन दोषी

‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’ या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी आरिफ हुसेन याला येथील विशेष न्यायालयाने दोषी ठरवले, अशी माहिती ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने (‘एन्आयए’ने) दिली.