बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केल्याचा डाग पुसण्याचे काम आम्ही केले ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

५ मार्च या दिवशी उद्धव ठाकरेंनी येथील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपवर टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सार्वजनिक सभा घेतली. या सभेला प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शवली आहे. या सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

गुढीपाडव्याच्या दिवशी हलाल मांसाला विरोध करून झटका मांस खरेदी करा !

हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदु संघटना यांच्याकडून कर्नाटकातील हिंदूंना आवाहन !

छत्रपती संभाजीनगर येथे ‘हिंदु जनगर्जना मोर्चा’ !

छत्रपती संभाजीनगर नामांतरणाच्या समर्थनार्थ आणि ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर यांविरोधात कठोर कायदे होण्यासाठी ६० सहस्रांहून अधिक हिंदूंच्या एकजुटीचा आविष्कार !

नाशिक येथे अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे पिकांची हानी !

अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे हाताशी आलेल्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यात २ बैल आणि ३ गायी दगावली असून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला आहे. 

न्यायाधीश आठवड्याचे सातही दिवस काम करतात ! – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी येथे ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये (परिषदमध्ये) बोलतांना दिली. न्यायालयातील प्रलंबित दावे आणि न्यायालयाला मिळणार्‍या सुट्या, यांविषयी नेहमीच प्रश्‍न उपस्थित केले जातात. त्यावर ते बोलत होते.

(म्हणे) ‘केवळ भारतीय लोकशाहीविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले; म्हणून मला देशद्रोही म्हणता येणार नाही !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

‘काँग्रेसच्या लोकांमध्ये देशद्रोह इतका ठासून भरला आहे की, त्यांना विदेशात जाऊन देशाचा अवमान करणे, हाही देशद्रोह वाटत नाही’, हे यावरून लक्षात येते !

इक्वेडोरमध्ये ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : १३ जणांचा मृत्यू

इक्वेडोर या दक्षिण अमेरिकन देशात १९ मार्च या दिवशी ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात १३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे खलिस्तानाठी करण्यात आलेल्या मतदानाचा फज्जा !

ब्रिस्बेन येथे १९ मार्च या दिवशी खलिस्तानसाठी ‘जनमत संग्रह २०२०’ (शिखांसाठी स्वतंत्र देश बनवण्यासाठी मतदान घेणे) नावाने मतदान घेण्यात आले; मात्र यात केवळ १०० शिखांनीच मतदान केल्याचे समोर आले आहे.

अजमेर दर्ग्याला मिळणार्‍या अर्पणामध्ये भ्रष्टाचार ! – सेवेकरी

हिंदूंच्या मंदिरांचे सरसकट सरकारीकरण करणारी सर्वपक्षीय सरकारे अशा दर्ग्यांचे सरकारीकरण करण्याचे धाडस दाखवतील का ?

पंजाबमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होण्यापासून सरकारने रोखावे ! – ज्ञानी हरप्रीत सिंह, श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार (प्रमुख)

राजकीय हितासाठी पंजाबमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यापासून सरकारने रोखले पाहिजे. सरकारने लोकशाहीमध्ये रहाणार्‍यांना आणि स्वतःचे म्हणणे मांडणार्‍यांना अवैधरित्या कह्यात घेण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे; कारण पंजाबने यापूर्वी पुष्कळ सोसले आहे, असे आवाहन श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार (प्रमुख) ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी केले आहे.