संजय राऊत यांच्याविषयी राज्यसभेचे अध्यक्ष घेणार निर्णय !
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगाच्या प्रस्तावित कारवाईने वेग धरला आहे. राऊत यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव २५ मार्च या दिवशी विधानसभेत मांडण्यात आला. त्यानंतर तो पुढील कारवाईसाठी राऊत सदस्य असलेल्या राज्यसभेच्या अध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे.
आंदोलकांवरील कारवाईअभावी विरोधकांचा सभात्याग !
२ दिवसांपूर्वी विधानभवनात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नेत्यांनी आंदोलन केले होते. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांनी विधानसभेत केली होती…
गोवा : अटल सेतू पूल वाहतुकीसाठी अंशत: खुला
अटल सेतूचा पणजी-म्हापसा भाग पुढील ५ दिवसांत, एकेरी वाहतूक २ एप्रिल या दिवशी, तर सर्व वाहतुकीसाठी हा पूल १० ते १२ एप्रिलपर्यंत खुला करण्यात येणार आहे. डागडुजीच्या कामामुळे अटल सेतू पूल काही दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.
मविआच्या आमदारांचे काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन !
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईच्या संदर्भात २५ मार्च या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन केले.
ठाणे जिल्हा परिषदेचे लाचखोर जलसंधारण अधिकारी कह्यात
५० सहस्र रुपयांची लाच घेणारे ठाणे जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे जलसंधारण अधिकारी राजेंद्र पाटील यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याने त्याची योग्य यंत्रणेकडून चौकशीचा विचार करू ! – देवेंद्र फडणवीस
मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता नाही, तसेच निविदा न काढताच कामे देण्यात आली आहेत. पारदर्शकतेचा अभाव, ढिसाळ नियोजन आणि निधीचा निष्काळजीपणे वापर मुंबई महापालिकेने केला आहे, असे निरीक्षण नोंदवून कॅगच्या अहवालात मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
सावरकर हे देशाचे दैवत आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
आजही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अवमान केला. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अवमान का करतात ? सावरकर हे देशाचे दैवत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी यातना सहन केल्या.
महाबळेश्वर, पाचगणी येथील अवैध बांधकामे पाडण्याचे सातारा जिल्हाधिकार्यांचे आदेश !
महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटन क्षेत्रांमध्ये करण्यात आलेल्या अवैध बांधकामांची वीज आणि पाणी जोडणी तोडावी, तसेच अवैधरित्या बांधण्यात आलेली बांधकामे पाडण्यात यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी महाबळेश्वरच्या तहसीलदार सपना चौधरी यांना दिले.
रायगडावर ५ आणि ६ एप्रिलला शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम !
६ एप्रिलला रायगडावर प्रातःकाळी ५ वाजता श्री जगदीश्वर पूजा, सकाळी ६ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव आणि सकाळी ८ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा करण्यात येईल.