क्रिकेट सामन्‍यांचे बंदोबस्‍त शुल्‍क वाढवून त्‍यातून पोलिसांची घरे दुरुस्‍त करावीत ! – हिंदु विधीज्ञ परिषदेची मागणी

पोलिसांनी क्रिकेट सामान्‍यांना दिल्‍या जाणार्‍या बंदोबस्‍ताचे शुल्‍क : आय.पी.एल्. २०२३-२७ चे ब्रॉडकास्‍टिंगचे हक्‍क ४४ सहस्र कोटींहून अधिक रकमेला विकले जात असतांना त्‍याचा लाभ राज्‍यातील पोलिसांना का मिळू नये ? – हिंदु विधीज्ञ परिषद

शासकीय नोकरीच्‍या आमिषाने महिलेची फसवणूक !

‘शासकीय नोकरीच्‍या आमिषाने महिलेची पावणेसहा लाख रुपयांची फसवणूक आणि अत्‍याचार करून जिवे मारण्‍याची धमकी दिल्‍याप्रकरणी अब्‍दुल राजकर रवाठार-शेख, तेजस्‍वी भास्‍कर चव्‍हाण आणि हिना अमन अफराज तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

हानीभरपाई देण्‍यासाठी ७ सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारून तलाठी पसार !

प्रशासकीय विभागातील लाचखोरांना कठोर शिक्षा केल्‍याविना लाच घेण्‍याचे प्रकार थांबणार नाहीत !

नव्‍या आर्थिक वर्षापासून ‘भीम’ प्रणाली होणार सशुल्‍क !

केंद्रशासनाची ‘भीम’ ऑनलाईन आर्थिक व्‍यवहार करणारी प्रणाली आता सशुल्‍क करण्‍यात आली आहे.

यवतमाळ येथे २ ठिकाणी ५१ फुटी रामध्‍वजाची पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते स्‍थापना !

श्रीरामनवमीनिमित्त येथे जय हिंद चौक आणि माळीपुरा येथील गणपतीच्‍या मंदिरासमोर ५१ फुटी रामध्‍वजाची स्‍थापना पालकमंत्री संजय राठोड यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आली.

महामार्गावर ‘चिपलुन’, ‘पेन’ असे अशुद्ध भाषेत गावांच्या नावांचे फलक !

फलकांवर शहरांची नावे चुकीच्या पद्धतीने लिहिली जात आहेत. चिपळूणचे ‘चिपलुन’ किंवा पेणचे ‘पेन’ असे नामफलक काही ठिकाणी आहेत.

पालघर येथील साधूंच्या हत्येचे अन्वेषण ‘सीबीआय’कडे देण्यास सर्वोच्च न्यायालयाची अनुमती !

पालघर येथील साधूंच्या निर्घृण हत्येचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (सीबीआय) देण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. याविषयी न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ एप्रिल या दिवशी होणार आहे.

 कांदळी (जिल्हा पुणे) येथे श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी, तालुका जुन्नर (जिल्हा पुणे) येथील आश्रमात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे ! – मंत्री नितीन गडकरी

जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांचे हे पीठ केवळ धार्मिक कार्य करणारे नाही. सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रांत महाराजांनी कार्य केले आहे. धर्माच रक्षण करण्याचे मोठे काम महाराजांनी केले आहे.

जानेवारी २०२४ मध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपूणे खुला  होणार ! –  नितीन गडकरी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोव्यातील कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकास आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळेल.