शेवटच्‍या श्‍वासापर्यंत हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेच्‍या कार्यात ठामपणे उभे रहा ! – आमदार टी. राजा सिंह

भारत हिंदु राष्‍ट्र होईल, यात कोणतीही शंका नाही; पण या धर्मकार्यात आपले योगदान असणे आवश्‍यक आहे, असे उद़्‍गार तेलंगाणातील हिंदुत्‍वनिष्‍ठ आमदार श्री. टी. राजा सिंह यांनी काढले.

राज्य महिला आयोगाचे काम पुरुषांच्या विरोधात नसून ते समाजाच्या विकृतीच्या विरोधात आहे ! – रूपाली चाकणकर

प्रत्येक वेळेला साहाय्याला कुणी येईल ही भावना महिलांनी काढून टाकून स्वतःच्या आयुष्याची लढाई स्वतःच लढली पाहिजे. त्यांना संकटांचा सामना करता आला पाहिजे, असे प्रतिपादन रूपाली चाकणकर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शेतकर्‍यांची फसवणुकीची तक्रार !

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सभासद आणि समभाग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी फसवणूक केली आहे, अशी तक्रार २५ शेतकर्‍यांनी कोल्हापूर येथील आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे केली आहे.

मिरज येथून दत्त भक्तांसाठी आंध्रप्रदेशात जाण्यासाठी, तसेच अन्य गाड्या चालू करण्याची प्रवाशांची मागणी !

कोरोनानंतर कोल्हापूर, तसेच मिरज येथून धावणार्‍या अनेक गाड्या बंद करण्यात आल्या असून मध्य रेल्वेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

सर्वांना प्रेम, चांगली वागणूक आणि प्रत्येकाचा आदर बाळगूया !  

हिंदु धर्माचे संस्कार, परंपरा, विचारधारा आणि आदर्श असाच पुढे वाढवत ठेवू. सर्वांना प्रेम, चांगली वागणूक देऊन प्रत्येकाचा आदर बाळगूया, असा उपदेश प.पू. कानिफनाथ महाराज यांनी भक्तगणांना दिला.

रावतळे (चिपळूण) येथे हरिद्वार येथील अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने २४ कुंडी गायत्री महायज्ञ  !

उद्या २४ मार्च या दिवशी या महायज्ञाची पूर्णाहुतीने सांगता होणार आहे.

रत्नागिरी पोलीस दलाकडून स्वतंत्र ‘यू ट्यूब चॅनेल’चे उद्घाटन !

‘सामान्य जनतेपर्यंत अत्यावश्यक संदेश आणि माहिती पोचवण्याकरता पोलीस दलाचे हे स्वतंत्र ‘यू ट्यूब चॅनेल’ प्रभावी ठरेल’, असा विश्वास पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या वेळी व्यक्त केला.

मधुमेह – उच्च रक्तदाबासाठी एकच औषधाला भारत सरकारचे ‘पेटंट’  

मधुमेह आणि उच्च रक्तदाब अशा रुग्णांची सातत्याने होत असलेली वाढ चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर ‘गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी’ महाविद्यालयातील प्रा. अश्विनी भाऊसाहेब पाटील यांनी अशा रुग्णांसाठी एकच औषध निर्माण केले आहे.

२५ मार्चपासून देवरुख ते गोंदवले बसफेरीस प्रारंभ !

‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा नामजप अनुग्रहित करणारे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या गोंदवले या गावी जाण्यासाठी देवरुख एस्.टी. आगारातून २५ मार्चपासून बसफेरी चालू करण्यात येणार आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण पडताळून कार्यवाही करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना !

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.