ख्रिस्‍ती संस्‍थेचा धर्मप्रसाराचा प्रयत्न जाणा !

फलक प्रसिद्धीकरता नवी देहली येथील प्रगती मैदानातील ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’त ‘गिडियन्‍स इंटरनॅशनल’ या ख्रिस्‍ती संस्‍थेच्‍या वतीने लावण्‍यात आलेल्‍या स्‍टॉलवर बायबलचे विनामूल्‍य वितरण चालू होते. धर्मांतराचा हा प्रयत्न जागृत हिंदुत्‍वनिष्‍ठांनी उधळून लावला. याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा :  https://sanatanprabhat.org/marathi/658555.html

हिंदु जनजागृती समितीचा गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठीचा यशस्वी लढा !

ऐतिहासिक गड-दुर्गांच्‍या संवर्धनासाठी हिंदु जनजागृती समितीचा लढा भविष्‍यात ऐतिहासिकच ठरेल !

छत्रपती शिवरायांचा वारसा जपण्‍यासाठी सिद्ध होऊया !

जागतिक कीर्ती मिळूनही छत्रपती शिवरायांच्‍या महाराष्‍ट्रात मात्र त्‍यांच्‍या गडदुर्गांची झालेली दुरवस्‍था पाहून शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांच्‍या माना लज्जेने खाली जात असल्‍यास नवल ते काय ?

हिंदु धर्मावरील वांशिक आक्रमण; ‘लव्‍ह जिहाद’ एक राष्‍ट्रीय समस्‍या !

‘लव्‍ह जिहाद’ हे हिंदु धर्मियांकडून दुर्लक्षिलेले सर्वात मोठे धार्मिक संकट आहे. स्‍वतःच्‍या घरची स्‍वतः जन्‍म दिलेली लेक मुसलमान पुरुषाच्‍या जनानखान्‍यात शय्‍यासोबत करते, हे समजून-उमजूनही बेफिकीर ! निर्लज्‍ज !! ही आहे आमच्‍या हिंदु पालकांची मानसिकता.

गड-दुर्ग रक्षणाच्‍या कार्यात कसे सहभागी व्‍हाल ?

दुर्ग पर्यटन करणार्‍यांनो…! पर्यटकांनो, गडावर आपला दैदिप्‍यमान इतिहास अनुभवण्‍यासाठी जा. तेथे जाऊन केवळ छायाचित्रे किंवा ‘सेल्‍फी’ (स्‍वतःच स्‍वतःचे काढलेले छायाचित्र) काढण्‍यात वेळ न घालवता गड-दुर्ग यांचे ऐतिहासिक महत्त्व समजून घ्‍या. गडाच्‍या रक्षणकार्यात हातभार लावा !

हिंदु तरुणींनो आणि पालकांनो, ‘लव्‍ह जिहाद’चा विळखा नष्‍ट कसा कराल ?

तुमची मुले शाळा किंवा महाविद्यालय येथे गेल्‍यावर काय करतात, याची तुम्‍हाला माहिती आहे का ? शाळा किंवा महाविद्यालय यांच्‍या वेळा तुम्‍हाला ठाऊक आहेत का ?

भारतातील ‘लव्‍ह जिहाद’च्‍या षड्‍यंत्राची माहिती अमेरिकी दूतावासाने अमेरिकेच्‍या ‘सेक्रेटरी ऑफ स्‍टेट्‍स’ला पाठवल्‍याचा ‘विकीलिक्‍स’ने केलेला खुलासा !

‘भारतातील अमेरिकेच्‍या दूतावासातील अधिकारी वर्ग प्रतिदिन भारतातील महत्त्वपूर्ण घडामोडींविषयी अमेरिकेच्‍या ‘सेक्रेटरी ऑफ स्‍टेट्‍स’च्‍या कार्यालयात माहिती पाठवतात. ही माहिती पूर्णतः गोपनीय असते आणि त्‍या माहितीच्‍या आधारे अमेरिकेची भारतनीती ठरते.

राज्‍य पुरातत्‍व विभागाच्‍या दुर्बलतेची उदाहरणे !

औरंगजेबाच्‍या थडग्‍यावर लाखांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या घरावर कोट्यवधी रुपयांचा खर्च; मग गड-दुर्गांकडेच दुर्लक्ष का ? जेथे शिवरायांचे पाय लागले, जेथे मावळ्‍यांचे रक्‍त सांडले, त्‍या भूमीचा आदर पैशांनी होणारा नाही; परंतु पैशांनी जे होईल, ते करणे, हे शासनकर्त्‍यांचे कर्तव्‍य नाही का?

हिंदूंचा स्‍वाभिमान दडपण्‍याचे सुनियोजित षड्‌यंत्र !

शिवरायांना धर्मनिरपेक्ष ठरवले, तर भविष्‍यात हिंदुत्‍वाला आपोआप तिलांजली मिळेल, हे धर्मांधांनी जाणले आहे. गड-दुर्ग यांवर थडगी बांधून हिंदूंच्‍या या शक्‍तीस्रोताला तिलांजली देणे, हेच यामागील षड्‍यंत्र आहे. शिवरायांना इस्‍लामप्रिय दाखवण्‍याचेही त्‍यांचे षड्‍यंत्र वेळीच लक्षात घेऊन ते उलथवण्‍यासाठी संघटित व्‍हा !

गड-दुर्गांच्‍या संवर्धनासाठी हिंंदु विधीज्ञ परिषद देत असलेला लढा !

विजयदुर्ग केंद्रीय पुरातत्‍व विभागाच्‍या अखत्‍यारीत आहे. आरमारी इतिहासामध्‍ये त्‍याचे महत्त्व आहे. ब्रिटिशांची आक्रमणे येथूनच परतवून लावण्‍यात आली; पण गडाची दुरावस्‍था आहे.