इंदूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये बिलाल आझम नावाच्या मुसलमान तरुणाने त्याच्या सहकारी हिंदु मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. दोघांमध्ये दोन वर्षांपूर्वी एकत्र काम करतांना ओळख झाली होती. त्यानंतर बिलाल आझमने हिंदु तरुणीवर विवाहासाठी दबाव आणणे चालू केले. त्यास हिंदु मुलीने नकार दिला. यावर बिलाल आझम संतापला आणि त्याने चाकूचा धाक दाखवून हिंदु मुलीवर बलात्कार केला. बिलालने तिची अश्लील छायाचित्रे काढली आणि त्यांच्या आधारे त्याने तिला ‘ब्लॅकमेल’ करणे चालू केले. बिलाल आझमला कंटाळून पीडिता नोकरीसाठी बेंगळुरूला निघून गेली.
पीडित मुलगी इंदूरमध्ये परतल्यानंतर बिलाल आझमने पीडितेचा पुन्हा पाठलाग चालू केला. त्याने पीडित हिंदु मुलीवर लग्नासाठी दबाव आणणे चालू केले आणि तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजोरी करू लागला. या प्रकरणी पीडित मुलीने हिंदु संघटनांशी संपर्क साधला आणि १५ नोव्हेंबर २०२४ या दिवशी इंदूरमधील विजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे. बिलाल आझमवर कारवाई करण्याची मागणी हिंदु संघटनांनी केली आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांधांची वासनांधता जाणा ! |