‘जुनी पेन्शन योजना’ लागू करण्यास सरकार सिद्ध !

गेल्या ७ दिवसांपासून चालू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. ‘जुनी पेन्शन योजना’ पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल’, असे आश्वासन सरकारने दिल्याचे संपकर्‍यांच्या समन्वय समितीकडून सांगण्यात आले.

‘ओटीटी’ मंचावरील वाढती शिवीगाळ आणि अश्‍लीलता सहन करणार नाही !

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची चेतावणी !

मुंबईमध्ये बनावट औषधांचा सुळसुळाट, हस्तकांचे जाळे देहलीपर्यंत ! – संजय राठोड, मंत्री, अन्न आणि औषध प्रशासन

मुंबईतील सैफी या नामांकित खासगी रुग्णालयातील औषधालयात बनावट ‘ओरोफर फी.सी.एम्.’ या इंजेक्शनचा (शरीरातील लोहाचे प्रमाण वाढण्यासाठीचे इंजेक्शन) साठा आढळून आल्याप्रकरणी ३ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही साखळी देहलीपर्यंत पोचली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची होणार ‘ड्रोन’द्वारे होणार पहाणी ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. मे २०२३ पर्यंत महामार्गाची एक लेन पूर्ण होईल, तर डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल.

महिलांचे चुंबन घेऊन पळणार्‍या धर्मांधांच्या टोळीतील ४ जणांना अटक

जमुई (बिहार) येथील घटना !
असे घृणास्पद कृत्य करणार्‍यांना आजन्म कारागृहात डांबा !

सोलापूर रेल्वेस्थानकात बंद अवस्थेतील ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ चालू करावे !

अशी मागणी का करावी लागते ? रेल्वे प्रशासन यासंदर्भात स्वतःहून कृती का करत नाही ?

अनुसूचित जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यावरून माकपच्या आमदाराची आमदारकी रहित !

अशा प्रकारची फसवणूक करणार्‍यांना कारागृहातच टाकणे आवश्यक !

सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) येथील भारतीय दूतावासाची खलिस्तानवाद्यांकडून तोडफोड !

महासत्ता समजल्या जाणार्‍या अमेरिकेचे पोलीस अशा घटनांच्या वेळी झोपलेले असतात का ?

देशातील ९० टक्के मुसलमान धर्मांतरित !

जर असे आहे, तर कुणी त्यांना परत त्यांच्या मूळ धर्मात, म्हणजे हिंदु धर्मात घेण्यासाठी प्रयत्न करत असेल किंवा कुणी स्वच्छेने परत येत असेल, तर त्यात चुकीचे ते काय ?

ऑस्ट्रेलिया पोलिसांकडूनही आता खलिस्तान्यांच्या विरोधात कारवाईस प्रारंभ !

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये खलिस्तानी सार्वमताच्या नावाखाली झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी आता व्हिक्टोरिया पोलिसांनी कारवाई करण्यास आरंभ केला आहे.