राहुल गांधी अपरिपक्व नेते – किरण रिजिजू, केंद्रीय संसदीय मंत्री
नागपूर – काँग्रेसचे राहुल गांधी यांना राज्यघटना किंवा आदिवासी यांविषयी काहीही माहिती नसून ते जनतेमध्ये खोटी माहिती पसरवत आहेत. त्यांच्याकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते असले, तरी अजूनही ते अपरिपक्व नेते आहेत, अशी टीका केंद्रीय संसदीय मंत्री किरण रिजिजू यांनी केली.
मविआमुळे आजही दुष्परिणाम भोगावे लागतात !
केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांची टीका
ठाणे – महाविकास आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला, मेट्रोसह अनेक प्रकल्प थांबले, त्याचे दुष्परिणाम राज्याला आजही भोगावे लागत आहेत, अशी टीका केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांनी केली.
मतदान करणार्यांसाठी नाटकावर सवलत !
मुंबई – मतदान करणार्यांना ‘पाहिले न मी तुला’ या नाटकावर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग २० नोव्हेंबर या दिवशी शिवाजी मंदिर, दादर दुपारी ४ वाजता होईल.
भारतियांनी एकसंध रहावे ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
मुंबई – माझ्या समजुतीनुसार, आपण जात, धर्म, भाषा आणि लिंग या आधारावर विभागले जाऊ नये. आपण संघटित झाले पाहिजे. आपण भारतीय आहोत आणि आपल्याला एकसंध राहायला हवे, असा ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभाजित व्हाल, तर कापले जाल) त्यातील संदेश आहे, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सत्ता आल्यास मशिदींवरील भोंगे उतरवीन ! – राज ठाकरे
ठाणे – मशिदींवरील भोंगे काढलेच पाहिजेत. त्यात काही दुमत नाही. माझ्या हातात जर सत्ता आली, तर मी ४८ घंट्यांत हे भोंगे खाली उतरवीन. कुराणच्या कुठल्या पानावर लाऊडस्पीकर लावा असे म्हटले आहे ? कुराण ज्या वेळी लिहिले, त्या वेळी लाऊडस्पीकरचा जन्म झाला होता का ? असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे घेतलेल्या सभेत केला.