सज्जाद नोमानी यांना अटक करण्याचीही मागणी
मुंबई – पी.एफ्.आय. (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) आणि आय.एस्.आय. यांसारख्या आतंकवादी संघटनांप्रमाणेच ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’वर बंदी आणा अन् बोर्डाचे सज्जाद नोमानी यांना अटक करा, अशी मागणी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी केली.
नितेश राणे पुढे म्हणाले की,
१. तालिबानसमर्थक सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला दिलेले समर्थन, हे ‘व्होट जिहाद’चे एक उत्तम उदाहरण आहे. मुस्लिम लॉ बोर्डाचा प्रतिनिधी म्हणून नोमानी ‘व्होट जिहाद’ची भाषा करत होते; परंतु आपल्या देशात राहून हे करण्याची काय आवश्यकता ? देशात राहून सगळ्या योजनांचा लाभ घ्यायचा आणि तिथेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड काढायचा. ‘वक्फ बोर्ड’च्या नावाने भूमी लाटायच्या. वक्फ बोर्ड हे कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये नसून फक्त भारतातच आहे.
२. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डसारखा विषय देशात हवाच कशाला ? देशात वेगळा कायदा कशाला हवा ? ज्याप्रमाणे देशातील अन्य नागरिकांना सोयीसुविधा मिळतात, त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा (मुसलमानांनी) जगायला शिका. केवळ मुसलमानांसाठी वेगळा पर्सनल लॉ बोर्ड कशाला ? या सगळ्यांची हिंदु राष्ट्रात आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांच्यावर बंदी आणायला हवी.
३. सज्जाद नोमानी यांचा इतिहास पाहिल्यास ते तालिबानसमर्थक आहेत. जाहीर फतवे काढणारा हा ‘सफेद कॉलर’ आतंकवादी आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे कसाबला संपवले, तोच नियम या नोमानीला लावायला हवा. देशात राहून ते अशा प्रकारचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चालवू शकत नाहीत. वक्फ बोर्डाच्या नावाने भूमी लाटणे महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही.
४. एक हिंदु असूनही ठाकरे गटातील संजय राऊत यांच्यासारखी माणसे त्यांचे समर्थन करतात; पण ते तुमचे तरी होणार का ? ते स्वतःच्या धर्मापलीकडे कुणालाही मानत नाहीत.
५. महाराष्ट्रातील हिंदु समाजासमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘एक है तो सेफ है’ (एकत्र असलो, तर सुरक्षित आहोत) ही वस्तूस्थिती मांडत आहेत. हा विचार हिंदु समाजाने घेतला नाही, तर उद्या हा नोमानी तुमच्या घरात ‘देवतांची पूजा करू नका’, असा फतवा काढेल. त्या वेळी हा हिंदु समाज कुठे जाणार ? हाच विचार देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून व्यक्त केला; पण जर संजय राऊत त्यांच्यावर टीका करत असतील, तर कसाब आणि संजय राऊत यांच्यात काहीच फरक नाही.
उघडा डोळे, बघा नीट ! – आशिष शेलार, भाजप नेते
मुंबई – मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर पाठवून ‘उघडा डोळे, बघा नीट’ असे आवाहन जनतेला केले आहे. तसेच ‘एक है तो सेफ है ।’ (एकत्र असाल, तर सुरक्षित रहाल) अशी घोषणाही दिली.
सज्जाद नोमानी यांच्यावर कारवाई करावी ! – किरीट सोमय्या, भाजप नेते
मुंबई – सज्जाद नोमानी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुसलमानांच्या धार्मिक भावना भडकावणे, द्वेषयुक्त भाषण करणे, भाजपचे समर्थन करणार्या मुसलमानांवर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन करणे आणि ‘व्होट जिहाद’चे आवाहन करणे, यांमुळे नोमानी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.