वेब सिरीजवर सरकारने नियंत्रण ठेवून त्‍यासाठी ‘सेन्‍सॉर बोर्ड’ लागू करावा ! – सतीश कल्‍याणकर, माजी सदस्‍य, केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ

आज वेब सिरीजमधून हिंसेला प्रोत्‍साहन दिले जात आहे. वेब सिरीजच्‍या विरोधात सरकार जोपर्यंत ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील.

गेल्‍या ३ वर्षांत केंद्रीय  सशस्‍त्र पोलीस दलातील  ४३६ कर्मचार्‍यांची आत्‍महत्‍या !

अशांना जीवनाचे महत्त्व आणि त्‍यातील संकटांना सामोरे जाण्‍याविषयी शिकवण्‍यात न आल्‍याचाच हा परिणाम आहे ! हिंदु राष्‍ट्रात प्रत्‍येकाला साधना शिकवण्‍यात येईल, त्‍यामुळे कुणी आत्‍महत्‍या करणार नाही !

दोषी कपिल कश्‍यप याला फाशीची शिक्षा !

अशा घटनांत अशीच शिक्षा होणे अपेक्षित आहे. बलात्‍काराच्‍या सर्वच गुन्‍ह्यांत फाशीचीच शिक्षा होऊ लागली, तर अशा घटना अल्‍प होण्‍यास वेळ लागणार नाही !

मध्‍यप्रदेशात सामूहिक बलात्‍कार आणि हत्‍येच्‍या घटनेनंतर आदिवासींचे पोलीस ठाण्‍यावर आक्रमण

मध्‍यप्रदेशातील महूमध्‍ये आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्‍कार करून तिची हत्‍या केल्‍याच्‍या घटनेनंतर आदिवासींनी पोलीस ठाण्‍यावर आक्रमण केले. या वेळी झालेल्‍या दगडफेकीत अनेक जण घायाळ झाले. बचावासाठी पोलिसांनी गोळीबार केला आणि अश्रुधुराच्‍या नळकांड्या फोडल्‍या.

दोषी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

रामनगर (जिल्‍हा नगर) येथील धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्‍या अत्‍याचारांचे प्रकरण

हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथे अज्ञातांनी मंदिरातील शिवलिंगाची केली तोडफोड !

अशी घटना एखादे चर्च किंवा मशीद यांच्‍या संदर्भात घडली असती, तर ‘देशात अल्‍पसंख्‍यांक असुरक्षित आहेत’, अशी आरोळी ठोकण्‍यात आली असती आणि हिंदूंना तालिबानी ठरवण्‍यात आले असते; मात्र हिंदूंच्‍या संदर्भात ही घटना घडल्‍याने सर्व जण शांत आहेत !

बामणोली तर्फ कुडाळ येथील सैनिक प्रथमेश पवार यांची जम्‍मूत आत्‍महत्‍या नसून हत्‍याच ! – संजय पवार, प्रथमेश यांचे वडील

बामणोली तर्फ कुडाळ येथील सैनिक प्रथमेश संजय पवार यांनी आत्‍महत्‍या केली नसून त्‍यांची हत्‍याच झाली होती. या प्रकरणी जम्‍मू पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे, अशी माहिती सैनिक प्रथमेश पवार यांचे वडील संजय पवार यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांतता पुरस्‍काराचे प्रबळ दावेदार !

रशिया आणि युक्रेन यांच्‍यातील युद्ध रोखवण्‍यासाठी पंतप्रधान मोदी सर्वांत विश्‍वासार्ह नेते आहेत अन् ते जगभरात शांतात प्रस्‍थापित करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्‍यक्ष पुतिन यांची समजूत काढण्‍याचा प्रयत्न केला.

वाराणसीच्‍या धर्तीवर नाशिक येथे ‘गोदा आरती’ चालू करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्‍कृतिक कार्यमंत्री

भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाच्‍या निमित्ताने वाराणसीच्‍या धर्तीवर नाशिक येथील रामतीर्थावर भव्‍य-दिव्‍य स्‍वरूपात गोदा आरती चालू करण्‍याचा निर्णय सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.

कॉपीचे प्रकार न थांबल्‍यास राज्‍याचे वाटोळे होईल ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

नगर जिल्‍ह्यातील टाकळी-मनोरा (तालुका पाथर्डी) येथील इयत्ता १० वीच्‍या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना कॉपी पुरवणार्‍या जमावाकडून लाठ्या-काठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्‍यात आली आहे.