श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सव !
कोल्हापूर – येथील मार्केड यार्ड परिसरात चालू असलेला यज्ञ आणि कर्मकांड हे अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे आहे, असा कांगावा करून याविरोधात पुरो(अधो)गामी विचारसरणीच्या लोकांनी शाहूपुरी पोलिसांना तक्रार देण्याचा प्रयत्न केला; परंतु ही तक्रार न घेतल्याने त्यांची फजिती झाली.
अवैज्ञानिक दावे करणार्या ‘श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवा’च्या विरोधात आणि तेथील यज्ञाच्या विरोधात डावे अन् पुरो(अधो)गामी हे ३ मार्चला मोर्चा काढणार आहेत. या मोर्च्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, माकप, भाकप, संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार पक्ष सहभागी होणार आहेत.
(यज्ञ हे भारतीय संस्कृतीचे मूलभूत धार्मिक अंग आहे. यज्ञामागील विज्ञान आणि धर्मशास्त्र समजून न घेणार्यांची बौद्धिक दिवाळखोरीच यावरून लक्षात येते. यज्ञाला विरोध करणारे एकप्रकारे हिंदु धर्मालाच विरोध करत आहेत. यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर होऊ नये; म्हणून प्रशासनाने या संदर्भात योग्य ती नोंद घेऊन अशा घटना रोखाव्यात ! – संपादक)
संपादकीय भूमिकासाडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या आणि कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या यज्ञाला केवळ प्रसिद्धीसाठी विरोध करणारे पुरो(अधो)गामी देशभरातील सर्व स्तरांवरील भयावह प्रदूषणाविषयी मूग गिळून गप्प बसतात, हे लक्षात घ्या. हिंदुत्वनिष्ठांचे बलस्थान असणार्या कोल्हापूरमध्ये पुरो(अधो)गाम्यांना हे धैर्य होणे अपेक्षित नाही ! |