राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ‘लव्ह जिहाद’च्या हिंदुविरोधी षड्यंत्राला ‘आंतरधर्मीय विवाह’ ठरवण्याचा प्रयत्न !

सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जितेंद्र आव्हाड निरुत्तर ! अजित पवार यांनी वादविवाद थांबवण्याचे आवाहन केले.

बारामती (पुणे) येथे भारतातील पहिल्या ‘देशी गोवंश सुधारणा प्रकल्पा’चे उद्घाटन ! 

अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ संचलित भारतातील पहिला देशी गोवंश सुधारणा प्रकल्प (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रूव्हमेंट – पशूधन अनुवंश सुधारणा केंद्र) आणि ‘एम्ब्रियो ट्रान्सफर लॅबोरेटरी’ यांचे उद्घाटन ११ मार्चला होणार आहे.

प्रदूषणामुळे कृष्णा नदीच्या काठावर लाखो माशांचा मृत्यू : मासे नेण्यासाठी नागरिकांची झुंबड !

साखर कारखान्याच्या मळीच्या प्रदूषणामुळे कृष्णा नदीत लाखो माशांच्या मृत्यू झाला आहे. उदगाव-अंकलीजवळ या माशांचा खच पडला असून शेकडो लोकांनी हे मृत्यूमुखी पडलेले मासे नेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

५० सहस्र रुपयांची लाच घेतांना महावितरण उपकार्यकारी अभियंता विंचूरकर याला पकडले ! 

अशा लाचखोरांसमवेत त्यांच्या कुटुंबियांचीही संपत्ती जप्त केली, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल !

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या मुख्यालयात ‘महिलादिन’ उत्साहात साजरा ! 

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात जागतिक महिलादिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

सोलापूर येथे अग्नीशमन केंद्रासाठी जागा निश्चित !

अक्कलकोट रस्ता एम्.आय.डी.सी. येथे स्वतंत्र अग्नीशमन केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली. पाण्याच्या टाक्यांजवळ साडेचार सहस्र चौरस फूट जागेची पहाणी करण्यात आली.

एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

केंद्रशासन आणि राज्यशासन यांनी औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर केले. त्याला विरोध म्हणून एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह ९ मार्चच्या रात्री शहरात ‘मेणबत्ती मोर्चा’ काढला.

सर्व कक्षांमध्ये सनातनचा कक्ष वैशिष्ट्यपूर्ण ! – सौ. शुभांगी बिरमुळे, सरपंच, रेठरेहरणाक्ष

महिलादिनाच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी २६ वेगवेगळ्या प्रकारचे कक्ष लावण्यात आले होते. यातील एक कक्ष सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा लावण्यात आला होता.

श्री. लक्ष्मण माने

(म्हणे) ‘महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी भयमुक्त पोषक वातावरण निर्मितीची आवश्यकता !’ – ‘उपराकार’ लक्ष्मण माने

कुटुंबातील स्त्री शिकली, तर तिच्या सर्व पिढ्या पुढे जातात. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत आहेत. शिक्षण आणि नोकरीच्या समान संधी शोधत आहेत.

जौहर महमूद याने केली डॉ. सुमेधा शर्मा हिची चाकूने हत्या !

जम्मू येथे जौहर महमूद याने त्याची प्रेयसी डॉ.सुमेधा हिची मांस कापणार्‍या चाकूने हत्या केली. नंतर त्याने स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी जौहर याला रुग्णालयात भरती केले असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.