पेण येथे लक्‍झरीमधील प्रवाशांना मारहाण करत १५ तोळे सोने लुटले

येथून बोरीवली येथे जाणार्‍या लक्‍झरी बसमधील प्रवाशांना पेण तालुक्‍यातील कोपर फाटा येथे मारहाण करत त्‍यांच्‍याकडून १५ तोळे सोने लुटल्‍याची घटना १२ मार्चला उत्तररात्री ३ वाजता घडली आहे.

मुंबईत मार्चच्‍या शेवटी ‘जी-२०’ शिखर परिषद !

मुंबईत ‘जी-२०’ शिखर परिषदेच्‍या विकास कार्यगटाची दुसरी बैठक मार्चच्‍या शेवटी होणार आहे. बैठकीच्‍या पूर्वसिद्धतेसाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे.

आजपासून राज्‍यातील १८ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर !

जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्‍यातील १८ लाख सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामुळे सरकारी रुग्‍णालये, शाळा, महाविद्यालये, पालिका, बहुतांशी सरकारी विभाग ठप्‍प होणार आहेत.

लोक हिंद गौरव पुरस्कार २०२३’ साठी शहापूर येथे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

लोक हिंद वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक शिवमार्गतर्फे दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘लोक हिंद गौरव’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते.

‘ईडी’च्‍या कारवाईच्‍या विरोधात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांची मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका !

सक्‍तवसुली संचालनालयाने (‘ईडी’ने) राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना १३ मार्चला मुंबईत उपस्‍थित रहाण्‍याविषयी नोटीस बजावली होती; मात्र हसन मुश्रीफ यांनी ‘ईडी’समोर स्‍वत: उपस्‍थित न रहाता त्‍यांचे अधिवक्‍ता प्रशांत पाटील यांच्‍या वतीने मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे.

गड-दुर्गांवर मद्यपान केल्यास ३ मासांची शिक्षा !

या संदर्भात विधी आणि न्याय विभागाला संमतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. राज्यातील गड-दुर्गांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याविषयीची लक्षवेधी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी मांडली होती.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने पंढरपूर येथे २० दिवसांचे शाहिरी प्रशिक्षण शिबिर !

महाराष्‍ट्राची शान असलेल्‍या शाहिरी लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्‍यासाठी येथे राज्‍यस्‍तरीय शाहिरी प्रशिक्षणास प्रारंभ करण्‍यात आला आहे.

धान्य वाटपातील ‘कमिशन’चा प्रश्‍न तातडीने सोडवा !- जिल्हाध्यक्ष अशोक कदम

कोरोनाकाळात रेशन दुकानदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे; मात्र गेल्या काही वर्षांपासून रेशन दुकानदारांना वाहतूक ‘रिबेट’ आणि अन्नधान्य वाटप ‘कमिशन’साठी सातत्याने झगडावे लागत आहे.

रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न आता सत्यात उतरेल ! – अधिवक्ता विलास पाटणे

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांचे हे स्वप्न आता सत्यात उतरेल.

कोकण कृषी विद्यापीठाकडून बागायतदारांना मार्गदर्शक सूचना

सद्यःस्थितीत जिल्ह्यात आंबा आणि काजू हे मोहोर ते फळपक्वतेच्या सर्व अवस्थेमध्ये आहे. हवामान अंदाजानुसार, तापमानात वाढ झाल्यामुळे आंबा फळगळ होण्याची, तसेच फळे भाजण्याची किंवा तडकण्याची शक्यता आहे.