अहिल्यानगर – निवडणुका आल्यानंतर लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. अडीच वर्षांपासून राज्यात आणि १० वर्षांपासून केंद्रात यांचेच सरकार आहे. असे असतांना निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आताच का दिले जात आहेत ? असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी येथे उपस्थित केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पार पडली. त्या वेळी त्या बोलत होत्या.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि सत्ताधारी यांचे विचार वेगळे आहेत; मात्र बाळासाहेबांविषयी कायमच मनात आदर आहे. मागील १० वर्षांत महाराष्ट्रातील अनेक उद्योग दुसर्या राज्यात गेले आहेत. मागील १० वर्षांपासून राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यांनी महाराष्ट्राला कमजोर करण्याचे काम केले आहे.