गुरूंवरील दृढ श्रद्धा, भाव, उत्तम नेतृत्‍वगुण आणि प्रेमभाव या गुणांचा समुच्‍चय असणार्‍या पुणे येथील सौ. मनीषा पाठक (वय ४१ वर्षे) या १२३ व्‍या समष्‍टी संतपदी विराजमान !

पुणे जिल्‍ह्याचे अध्‍यात्‍मप्रसाराचे कार्य पहाणार्‍या आणि गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा, ईश्‍वरप्राप्‍तीचा दृढनिश्‍चय, उत्तम नेतृत्‍वगुण, प्रेमभाव अशा अनेक गुणांचा समुच्‍चय असणार्‍या सौ. मनीषा पाठक (वय ४१ वर्षे) या सनातनच्‍या १२३ व्‍या समष्‍टी संतपदी विराजमान झाल्‍या.

पुणे येथे ‘विश्‍व श्रीराम सेने’च्‍या वतीने श्रीरामनवमीनिमित्त महापूजा !

अंबिका भवन, साने चौक, मोरे वस्‍ती चिखली येथे श्रीरामनवमी निमित्त ‘विश्‍व श्रीराम सेने’च्‍या वतीने २२ मार्च ते ३० मार्च या कालावधीत नवदुर्गा पूजांचे, तसेच श्रीरामचरितमानस संकीर्तन, भजन, महापूजा हवन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.

पैठण येथील सार्वजनिक दहीहंडीविरोधातील नाथ वंशजांची याचिका फेटाळली !

जिल्‍ह्यातील पैठण येथील नाथ मंदिराबाहेर श्री संत एकनाथ महाराज विश्‍वस्‍त मंडळाच्‍या सार्वजनिकरित्‍या दहीहंडी फोडण्‍याच्‍या निर्णयाविरोधात नाथवंशजांकडून प्रविष्‍ट करण्‍यात आलेली फौजदारी याचिका मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या संभाजीनगर खंडपिठाने १४ मार्च या दिवशी फेटाळली.

मुंबई-गोवा महामार्गाच्‍या चौपदरीकरणाचे काम येत्‍या ९ मासांत पूर्ण होईल ! – रवींद्र चव्‍हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम

मुंबई-गोवा महामार्गाच्‍या कामासाठी आवश्‍यक भूसंपादन पूर्ण न झाल्‍याने कामाला विलंब होत होता; परंतु हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्‍हावा हीच शासनाची भूमिका आहे.

अलंकापुरीत तुकाराम बीज उत्‍सव उत्‍साहात साजरा !

आळंदी येथे १२ मार्च या दिवशी वारकरी साहित्‍य परिषदेच्‍या वतीने ‘तुकाराम बीज उत्‍सव’ उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. या वेळी वारकरी शिक्षण संस्‍थेच्‍या २ सहस्र विद्यार्थ्‍यांनी संतश्र्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज समाधी मंदिरापासून मावळ तालुका धर्मशाळेपर्यंत भव्‍य दिंडीचे आयोजन केले.

पुणे येथे सोळाव्‍या ‘पं. जितेंद्र अभिषेकी महोत्‍सवा’चे आयोजन

पं. जितेंद्र अभिषेकी यांच्‍या कार्याचा ठेवा पुढील पिढीला कळावा, या उदात्त हेतूने यंदा १६ व्‍या ‘पं. जितेंद्र अभिषेकी महोत्‍सवा’चे आयोजन २४ ते २६ मार्च या कालावधीत यशवंतराव चव्‍हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे करण्‍यात आले आहे.

कौटुंबिक न्‍यायालयातील वाहनतळ बंद असल्‍यामुळे अधिवक्‍त्‍यांची गैरसोय !

१२ ऑगस्‍ट २०१७ या दिवशी तत्‍कालीन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या मुख्‍य न्‍यायमूर्ती डॉ. मंजुळा चेल्लूर यांच्‍या हस्‍ते शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्‍यायालयाच्‍या नूतन वास्‍तूचे उद़्‍घाटन करण्‍यात आले होते

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील भूमापन प्रक्रिया पूर्ण करून प्रॉपर्टीकार्ड देण्‍यात येईल ! – शंभुराज देसाई, राज्‍य उत्‍पादन शुल्‍कमंत्री

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या संस्‍थेमध्‍ये विलीनीकरण करण्‍यात आले आहे. या संपादित क्षेत्रात निवासी, वाणिज्‍य, औद्योगिक, सार्वजनिक सुविधा आणि इतर प्रयोजन यांच्‍या भूखंडाचा ले-आऊट संमत करण्‍यात आलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर पुढील २ आठवडे कोणतीही कारवाई करू नये ! – मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

हसन मुश्रीफ यांना १३ मार्चला मुंबईत अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याचे समन्स बजावण्यात आले. त्यावर मुश्रीफ न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने वरील निर्देश दिले.

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संयुक्त सैनिकी सराव रोखा !

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात १३ मार्चपासून चालू झालेला संयुक्त सैनिकी सराव रोखावा, अशी मागणीउत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांनी संयुक्त राष्ट्रांकडे केली.