जलक्रीडा क्षेत्राचे खासगीकरण करणार नाही ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पॅराग्लायडिंग’साठी प्रतिग्राहक ८०० रुपये दर असतांनाही प्रत्येक ग्राहकाला ३ सहस्र रुपये आकारले जातात. जलक्रीडेवर कोणतेच नियंत्रण नाही. या दलालीला आताच न रोखल्यास पुढे ते गोव्याला महागात पडू शकते.

राहुल गांधींच्‍या थोबाडीत मारण्‍याचे धैर्य आहे का ? – मुख्‍यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना प्रश्‍न

एकनाथ शिंदे यांनी आपल्‍या सामाजिक संकेतस्‍थळांवरील ‘प्रोफाईल फोटो’ म्‍हणून स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र लावले असून त्‍यावर ‘आम्‍ही सारे सावरकर’ असे लिहिले आहे.

माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन पुन्‍हा फेटाळला !

विशेष न्‍यायाधीश आर्.एन्. हिवसे यांनी हा निकाल दिला. बँकेतील ४९६ कोटी ४४ लाख रुपयांच्‍या अपहारप्रकरणी भोसले यांच्‍यासह ७ जणांविरोधात दोषारोपपत्र प्रविष्‍ट केले आहे.

पत्रकाराचा अवमान केल्‍याप्रकरणी राहुल गांधी यांनी क्षमा मागावी ! – मुंबई प्रेस क्‍लब

नवी देहली येथील काँग्रेस कार्यालयात २५ मार्च या दिवशी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत प्रश्‍न विचारणार्‍या पत्रकाराला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भाजपसाठी काम करता का ?’, असे बोलून अपमानित केले.

गोव्यात सरकारी नोकरीसाठी खासगी नोकरीचा किमान १ वर्षाचा अनुभव बंधनकारक

मार्च २०२४ पर्यंत सरकारच्या विविध खात्यांमधील २ सहस्र ५७२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. निवृत्तीनंतर रिक्त झालेली सरकारी पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेला प्रारंभ केला आहे.

उद्धव ठाकरे गट सध्‍या तरी ‘मशाल’ चिन्‍ह वापरू शकणार !

उद्धव ठाकरे गटाला २७ मार्च या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयातून पुढील आदेशापर्यंत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्‍ह म्‍हणून वापरण्‍याची मुभा मिळाली आहे. मशाल चिन्‍हावर दावा करणारी समता पार्टीची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळून लावली आहे.

साकिनाका (मुंबई) येथील भीषण आगीत २ जणांचा मृत्‍यू !

साकीनाका येथील एका हार्डवेअरच्‍या दुकानाला लागलेल्‍या भीषण आगीत होरपळून २ कामगारांचा मृत्‍यू झाला. दुकानातील अन्‍य ९ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्‍यात अग्‍निशमन दलाला यश आले.

इम्रान खान यांची हत्या होईल किंवा आमची !

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी एका मुलाखतीत, ‘इम्रान खान यांनी देशाच्या राजकारणाला अशा वळणावर नेऊन ठेवले आहे, जिथे एकतर त्यांची हत्या होईल किंवा आमची’, असे स्फोटक वक्तव्य केले आहे.

(म्हणे) ‘बांगलादेशी मुसलमान देहलीवर इस्लामचा ध्वज फडकावतील !’ – बांगलादेशी मौलानाला पडले दिवास्वप्न !

अशा धर्मांध मुसलमानांवर कारवाई होण्यासाठी केंद्रशासनाने बांगलादेशच्या शेख हसीना सरकारला बाध्य केले पाहिजे !

नेदरलँड्सचे खासदार विल्डर्स यांना ठार मारण्याचा फतवा !

आमचा फतवा अंतिम आहे, अशा प्रकारे ज्या मुसलमानाने माझ्याविरोधात फतवा जारी केला आहे, त्याने मला ठार मारण्यासाठी मुसलमानांना आवाहन केले आहे. हे कृत्य करण्यात कुणा मुसलमानाने अपराधीभाव आणू नये, असे त्याचे म्हणणे आहे.